महिला वनडे वर्ल्ड कप : भारत-बांगलादेश सामना पावसामुळे रद्द

0

नवी मुंबई : महिला एकदिवसीय विश्वचषक २०२५ चा शेवटचा साखळी सामना पावसामुळे रद्द करण्यात आला. भारताचा बांगलादेशशी सामना झाला. पण नवी मुंबईत झालेल्या मुसळधार पावसामुळे सामना निकालाविना रद्द करण्यात आला. आता ३० ऑक्टोबर रोजी उपांत्य फेरीत भारताचा सामना बलाढ्य ऑस्ट्रेलियाशी होणार आहे. या सामन्यात भारतीय कर्णधार हरमनप्रीत कौरने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. प्रथम फलंदाजी करताना बांगलादेशने २७ षटकांत नऊ गडी गमावून ११९ धावा केल्या. भारतासमोर विजयासाठी १२६ धावांचे लक्ष्य ठेवण्यात आले होते.

या आव्हाना पाठलाग करत असताना पाऊस आला तेव्हा टीम इंडियाने बिनबाद ५७ धावा केल्या होत्या आणि त्यानंतर सामना अनिर्णीत घोषित करण्यात आला. पावसामुळे सामना उशिरा सुरू झाला आणि प्रत्येकी ४३ षटकांचा करण्यात आला. पण सामन्याच्या मध्यात पाऊस पुन्हा आला. ज्यामुळे सामना २७ षटकांचा खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला. तरीह हवामान स्वच्छ झाले नाही आणि सामना अखेर रद्द करण्यात आला. परिणामी दोन्ही संघांना प्रत्येकी एक गुण देण्यात आला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech