वेळापत्रकानुसार ३ एकदिवसीय , ५ टी-२० सामने खेळाणार
मुंबई : न्यूझीलंड संघ पुढील वर्षाच्या सुरुवातीला भारत दौऱ्यावर येणार आहे. या काळात दोन्ही संघांमध्ये ३ एकदिवसीय आणि ५ टी-२० सामन्यांची मालिका खेळवली जाईल. या मालिकेचे वेळापत्रक बीसीसाआय म्हणजेच भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने जाहीर केले आहे. एकदिवसीय मालिका ११ जानेवारीपासून सुरू होईल आणि शेवटचा सामना १८ जानेवारीला खेळवला जाईल. त्यानंतर, टी-२० मालिका २१ जानेवारीपासून सुरू होईल. या मालिकेतील शेवटचा सामना ३१ जानेवारीला खेळवला जाईल.
भारत विरुद्ध न्यूझीलंड एकदिवसीय मालिका पहिला एकदिवसीय सामना ११ जानेवारीला हैदराबादमध्ये, दुसरा एकदिवसीय सामना १४ जानेवारी रोजी राजकोटमध्ये आणि तिसरा एकदिवसीय सामना १८ जानेवारीला इंदूरमध्ये खेळवण्यात येईल. तर भारत विरुद्ध न्यूझीलंड टी२० मालिकेतली पहिला सामना २१ जानेवारी रोजी नागपूरमध्ये,दुसरा सामना २३ जानेवारी रोजीरांचीमध्ये, तिसरा टी२० सामना २५ जानेवारीला गुवाहाटीत, चौथा सामना हा २८ जानेवारी रोजी विशाखापट्टणमध्ये तर पाचवा आणि अंतिम टी-२०सामना ३१ जानेवारीलात्रिवेंद्रम इथे खेळवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. भारत आणि न्यूझीलंड अलीकडेच आयसीसी चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ च्या अंतिम सामन्यात आमनेसामने आले होतेय या मुकाबल्यामध्ये भारताने बाजी या स्पर्धेतेचे तब्बल वर्षांनंतर विजेतेपद पटकावले होते.