दुशानबे : भारत आणि ताजिकिस्तान यांच्यातील मैत्रीपूर्ण सामन्यातदहा जणांच्या भारतीय अंडर-२३ फुटबॉल संघाला यजमान ताजिकिस्तानकडून ३-२ असा पराभव पत्करावा लागला. टालको अरेना येथे झालेल्या या सामन्यात इंज्युरी टाईममध्ये दोन गोल झाले. दोनदा आघाडी घेतल्यानंतरही दुसऱ्या हाफमध्ये रेड कार्ड मिळाल्याने या संघाला विजय साकारता आला नाही.
आगामी एएफसी अंडर-२३ आशियाई कप २०२६ पात्रता फेरीसाठी तयारी करणाऱ्या भारताने या सामन्यात चांगली सुरुवात केली. ३३ व्या मिनिटाला त्यांच्या प्रयत्नांना यशही आले. भारताने गोल करत १-० ने आघाडीही घेतली.दुसऱ्या हाफच्या दहा मिनिटांतच मिडफिल्डर आयुष छेत्रीला या सामन्यात दुसरे पिवळे कार्ड मिळाल्यानंतर त्याला मैदानाबाहेर जावे लागले. यानंतर तजाकिस्तानृने आक्रमक खेळ केला आणि सामना ३-२ ने जिंकला.