कायरन पोलार्डचा टी-२० मध्ये विश्वविक्रम, ७०० टी-२० सामने खेळणारा पहिला क्रिकेटपटू

0

न्यूयॉर्क : वेस्ट इंडिजचा स्फोटक फलंदाज कायरन पोलार्डने टी-२० क्रिकेटमध्ये एक नवा इतिहास रचला आहे. मेजर लीग क्रिकेटमध्ये म्हणजेच एमएलसी २०२५ च्या हंगमात एमआय न्यूयॉर्ककडून खेळताना त्याने हा विश्वविक्रम आपल्या नावावर केला आहे. तो ७०० टी-२० खेळणारा पहिला क्रिकेटपटू बनला आहे. सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न संघाविरुद्ध मैदानावर उतरताच त्याने हा टप्पा गाठला. सामन्यानंतर कायरन पोलार्ड म्हणाला की, ‘इतके दिवस खेळात राहणे आणि क्रिकेटच्या कोणत्याही स्वरूपात ७०० सामने खेळणे, हे मला स्वतःचे एक यश वाटते. आणि याचे श्रेय मी स्वत:लाच देणार आहे.’ पोलार्डने एमआय न्यूयॉर्ककडून खेळताना ७०० टी२० सामने खेळण्याचा विक्रम रचला. असा पराक्रम करणारा तो क्रिकेटपटू ठरला आहे. टी२० क्रिकेटच्या इतिहासात सर्वात जास्त सामने खेळणारा पोलार्ड सॅन फ्रान्सिस्को युनिकॉर्न्स संघाविरुद्ध ७०० सामने खेळण्याच्या विक्रमापासून फक्त एक सामना मागे होता.

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech