मुंबई : भारत आणि पाकिस्तानमधील युद्धविरामानंतर येत्या १७ एप्रिलपासून आयपील २०२५ मधील उर्वरित सामने खेळवले जाणार आहेत. याबाबत बीसीसीआयने सुधारित वेळापत्रक जाहीर केले आहे. मात्र, याआधीच लखनऊ सुपर जायंट्सला मोठा धक्का बसला आहे.लखनौचा वेगवान गोलंदाज मयांक यादव स्पर्धेतून बाहेर झाला असून त्याच्या जागी बदली खेळाडूची घोषणा करण्यात आली आहे.
लखनऊच्या संघाने दिलेल्या माहितीनुसार, संघाचा वेगवान गोलंदाज मयांक यादव पाठीच्या दुखापतीमुळे स्पर्धेतून बाहेर झाला आहे. लखनौच्या उर्वरित सामन्यांमध्ये मयांक यादवऐवजी न्यूझीलंडचा वेगवान गोलंदाज विल्यम ओ’रोर्क संघाचे प्रतिनिधीत्व करेल. मयांक बेंगळुरू येथील राष्ट्रीय क्रिकेट अकादमीत परतला आहे.मयांक यादव मुंबई इंडियन्स आणि लखनऊ सुपर जायंट्स विरुद्धच्या सामन्यांमध्ये खेळला. दोन सामन्यात त्याला दोन विकेट्स मिळवता आले. आयपीएलच्या इतिहासात १५६.७ किमी प्रतितास वेगाने गोलंदाजी करून प्रसिद्धीझोतात आलेला हा वेगवान गोलंदाज वेगाशी झुंजताना दिसला.
भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे आयपीएल २०२५ पुढे ढकलण्यात आले. आयपीएलमध्ये आतापर्यंत ५७ सामने खेळले गेले आहेत. नुकतेच बीसीसीआयने अंतिम सामन्यासह १७ सामन्यांचे सुधारित वेळापत्रक जाहीर केले. त्यानुसार, पंजाब आणि दिल्ली यांच्यातील रद्द झालेला सामना पुन्हा खेळवला जाईल. दोन्ही संघांमधील हा सामना २४ मे रोजी जयपूर येथे होणार आहे. आयपीएल २०२५ चा अंतिम सामना २५ मे ऐवजी ३ जून रोजी खेळवला जाईल.