
मुंबई : भारतीय महिला संघाची उपकर्णधार स्मृती मंधाना लवकरच प्रसिद्ध संगीतकार पलाश मुच्छल यांच्याशी लग्न करणार आहे. स्मृतीने गुरुवारी आपल्या सोशल मीडिया हँडलवर एक रील शेअर करत पलाशसोबतच्या साखरपुड्याची अधिकृत घोषणा केली. स्मृतीने ‘मुन्नाभाई स्टाईल’मध्ये आपला साखरपुडा झाल्याची माहिती दिली.
स्मृती मंधानाच्या लग्नाची तयारी जोरात सुरू झाली आहे. गुरुवारी जेमिमा रॉड्रिग्जने आपल्या सोशल मीडिया हँडलवरून टीम इंडियाची एक मजेशीर रील शेअर केली. या रीलमध्ये स्मृती मंधानाने ‘मुन्नाभाई स्टाईल’मध्ये आपल्या साखरपुड्याची बातमी पुष्टी केली. व्हिडीओमध्ये दिसते की टीम इंडियाचे सर्व खेळाडू स्मृतीसोबत तिच्या लग्नाचा आनंद साजरा करत आहेत.
स्मृती मंधाना आणि पलाश मुच्छल महाराष्ट्रातील सांगली येथे सात फेरे घेतील. २३ नोव्हेंबर रोजी हे दोघेहि विवाहगाठ बांधणार आहेत. या हाय-प्रोफाइल लग्नाचे निमंत्रणपत्र इंदूरमधील मुच्छल कुटुंबाच्या नातेवाईकांना आणि पाहुण्यांना देण्यात आले आहे. लग्न आणि त्यानंतरची पार्टी सांगलीतच होणार आहे. लग्नानंतर इंदूरमध्ये रिसेप्शन देण्याची योजना सध्या मुच्छल कुटुंबाने केलेली नाही. माहितीनुसार, पलाश आणि स्मृती लग्नानंतर मुंबईत एक पार्टी देऊ शकतात, ज्यात फिल्म इंडस्ट्रीतील कलाकार आणि क्रिकेटर्स हजर राहू शकतात.