मुंबई : मुंबईच्या पोलीस आयुक्तपदी नियुक्ती झाल्यावर श्री. देवेन भारती यांनी सपत्नीक प्रभादेवी येथील श्री सिद्धिविनायक मंदिरात जाऊन श्री गणरायाची यथासांग पूजा केली. त्यावेळी श्री सिद्धिविनायक देवस्थान ट्रस्टचे विश्वस्त श्री. गोपाळराव दळवी आणि श्रीमती मीना कांबळी यांनी त्यांना श्री सिद्धिविनायकाची मूर्ती देऊन स्वागत केले तसेच मुंबईच्या नागरिकांना आपल्या सेवेतून दिलासा द्यावा, असे आवाहन केले.