पाकिस्तानी सुरक्षा दल आणि दहशतवाद्यांच्या चकमकीत १४ दहशतवादी ठार

0

इस्लामाबाद : पाकिस्तानी सुरक्षा दलांनी वायव्य पाकिस्तानातील अफगाणिस्तानच्या सीमेला लागून असलेल्या आदिवासी जिल्ह्यात गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाईत १४ दहशतवाद्यांना ठार मारले आहे.याबाबतची माहिती लष्करी मीडिया विंगने बुधवारी(दि.४) दिली. इंटर-सर्व्हिसेस पब्लिक रिलेशन्सने(आयएसपीआर) जारी केलेल्या निवेदनानुसार, “२-३ जून २०२५ रोजी, दहशतवाद्यांच्या उपस्थितीच्या माहितीच्या आधारे, सुरक्षा दलांनी उत्तर वझिरीस्तान जिल्ह्यातील दत्ता खेल येथे गुप्तचर यंत्रणेवर आधारित कारवाई सुरू केली.

सैन्याने या भागातील एका दहशतवाद्यांच्या अड्ड्यावर छापा टाकला. जोरदार गोळीबारानंतर १४ दहशतवादी मारले गेले. त्यात म्हटले आहे की, “या भागातील इतर दहशतवाद्यांना खात्मा करण्यासाठीही कारवाई केली जात आहे. पाकिस्तानचे सुरक्षा दल देशातील दहशतवादाचा धोका दूर करण्यासाठी काम करत आहेत असे पाकिस्तानी सैन्याने म्हंटले आहे. अलिकडेच अफगाणिस्तानातून पाकिस्तानात घुसखोरी करण्याचा प्रयत्न करताना झालेल्या चकमकीत तहरीक-ए-तालिबान पाकिस्तानचे किमान ४१ दहशतवादी मारले गेले होते. ही चकमक उत्तर वझिरिस्तानच्या आदिवासी जिल्ह्यातील बिबाक घर परिसरात झाली. मारले गेलेले बहुतेक दहशतवादी अफगाण नागरिक होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech