नवी दिल्ली : आंधप्रदेशची डांगेती जान्हवी ही नासाचा प्रतिष्ठित आंतरराष्ट्रीय हवाई आणि अंतराळ कार्यक्रम यशस्वीरित्या पूर्ण करणारी पहिली भारतीय ठरली आहे. यामुळे आता जान्हवी २०२९ मध्ये अमेरिकेतील एका प्रकल्पासाठी अंतराळात जाणार आहे. या प्रकल्पासाठी ती टायटनच्या ऑर्बिटल पोर्ट स्पेस स्टेशनला जाणार आहे. जान्हवी एसटीईएमशिक्षण कार्यक्रम आणि अंतराळ प्रसारात सक्रियपणे सहभागी होती. तिने इस्त्रोच्या शैक्षणिक कार्यक्रमांमध्ये व्याख्याने दिली आहेत. आणि राष्ट्रीय तंत्रज्ञान संस्था एनआयटीसारख्या प्रमुख शैक्षणिक संस्थांमध्ये विविध अंतराळ विषयांवर विद्यार्थ्यांना संबोधित केले आहे.
यापूर्वीती दीर्घकाळाच्या अंतराळ प्रवासात ग्रह विज्ञान आणि शाश्वततेशी संबंधित ऍनालॉग मोहिमा आणि जागतिक परिषदांमध्ये सक्रियपणे सहभागी होती. दांगेती जान्हवीने आंतरराष्ट्रीय खगोलशास्त्रीय शोध सहकार्यात योगदान दिले. ज्यामुळे एका लघुग्रहाचा शोध लागला. हा शोध पॅनोरॅमिक सर्व्हे टेलिस्कोप आणि रॅपिड रिस्पॉन्स सिस्टमच्या डेटावर आधारित होता. जान्हवी ही स्पेस आइसलँडच्या भूगर्भशास्त्र प्रशिक्षण कार्यक्रमासाठी निवडलेली पहिली भारतीय आणि सर्वात तरुण परदेशी ऍनालॉग अंतराळवीर होती.