एफ-३५बी लढाऊ विमान तपासणीसाठी ब्रिटनचे पथक केरळात

0

तिरुअनंतपुरम : गेल्या ३ आठवड्यांपासून अडकलेल्या रॉयल नेव्हीच्या एफ-३५बी लढाऊ विमानाची दुरुस्ती करण्यासाठी ब्रिटनमधील २४ जणांचे पथक तिरुअनंतपुरम येथे पोहोचले आहे. ब्रिटिश हवाई दलाचे एअरबस ए४००एम अॅटलस विमान या पथकासह तिरुअनंतपुरम येथे उतरले आहे. या टीममध्ये १४ तज्ञ आणि १० क्रू मेंबर्स आहेत. ही टीम लढाऊ विमान दुरुस्त करता येईल का किंवा ते मोडून ब्रिटनला परत नेले जाईल का ते तपासणार आहेत. ब्रिटनमधील तज्ञ केरळमध्ये राहून विमानाची तपासणी करतील आणि त्याची दुरुस्ती करण्याचा प्रयत्न करतील. सध्या तरी असे मानले जाते की एफ३५बी लढाऊ विमान ब्रिटनला नेण्याची योजना पुढे ढकलण्यात आली आहे.

रॉयल एअर फोर्सच्या एअरबस ए४००एम अॅटलसचा आकार इतका मोठा नाही की एफ३५बी वेगळे करून त्यात नेता येणार आहे. ए४००एमचा आकार सी-१३० हरक्यूलिसपेक्षा मोठा आहे. पण सी-१७ ग्लोबमास्टरपेक्षा लहान आहे. देखभाल, दुरुस्ती आणि ओव्हरहॉलिंगसाठी जागेची ऑफर ब्रिटनने स्वीकारली आहे. हे विमान ब्रिटनमधील तज्ञांच्या पथकाच्या देखरेखीखाली तेथे नेले जाईल. तर मदतीबद्दल ब्रिटनने भारताचे आभार मानले आहेत. दरम्यान, भारतीय नौदलासोबतच्या युद्ध सरावानंतर खराब हवामान आणि इंधनाच्या कमतरतेमुळे रॉयल नेव्हीचे एफ-३५बी लढाऊ विमान केरळमधील तिरुअनंतपुरम विमानतळावर उतरले. नंतर त्यात तांत्रिक बिघाड झाला. आणि हे विमान येथे अडकले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech