अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणच्या लढाऊ विमानांवर केला हल्ला

0

तेहरान : इराण आणि इस्रायलमध्ये गेल्या काही काळापासून सुरु असलेल्या युद्धात आता अखेर अमेरिकेनेही उडी घेतली आहे.अमेरिकेने इराणच्या तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी स्वतः ही माहिती दिली. तर दुसरीकडे इस्रायलनेही इराणला मोठा धक्का दिला आहे. इस्रायलने इराणच्या एफ-१४ लढाऊ विमानांवर हल्ला केला आहे. अमेरिकेच्या हल्ल्यानंतर इस्रायलने इराणच्या लढाऊ विमानांना लक्ष्य केले.मध्य इराणमध्ये सुमारे ६० इस्रायली हवाई दलाच्या लढाऊ विमानांनी हल्ले केल्याचे असे इस्रायल डिफेन्स फोर्सचे प्रवक्ते ब्रिगेडियर जनरल एफी डेफ्रिन यांनी पत्रकार परिषदेत सांगितले. हल्ल्यांचा एक भाग म्हणून, आयएएफच्या विमानांनी आणखी तीन इराणी एफ-१४ लढाऊ विमानांवर हल्ला केला.

गेल्या आठवड्यात, तेहरानमध्ये इस्रायली हल्ल्यात दोन एफ-१४ विमाने नष्ट करण्यात आली होती. अमेरिकेत बनवलेले एफ-१४ टॉमकॅट्स १९७९ च्या इस्लामिक क्रांतीपूर्वी इराणला पुरवले गेली होती आणि ती अजूनही वापरली जात होती. दरम्यान, अमेरिकेने इराणमधील तीन अणुऊर्जा प्रकल्पांवर हल्ला केला. यामध्ये फोर्डो, नतान्झ आणि एस्फहान यांचा समावेश आहे. अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी ही माहिती दिली आहे. रविवारी(दि.२२) भारतीय वेळेनुसार पहाटे ४:३० वाजता हा हल्ला झाला. फोर्डोवर बॉम्बचा एक संपूर्ण साठा टाकण्यात आला आहे. अमेरिकेच्या राष्ट्राध्यक्षांनी इराणला धमकी देत त्यांनी आता शांतता ठेवाव, जर त्यांनी तसे केले नाही तर त्यांच्यावर आणखी मोठे हल्ले केले जातील, असं म्हटलं.

इराणवरील हल्ल्यानंतर अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांनी या हल्ल्याची माहिती देशाला दिली. “या हल्ल्यांचे उद्दिष्ट जगातील दहशतवादाला प्रायोजित करणाऱ्या पहिल्या क्रमांकाच्या देशाकडून निर्माण झालेल्या अणु धोक्याला आळा घालणे आहे. मागच्या ४० वर्षांपासून इराण इस्राइलला, अमेरिकेला संपवण्याची भाषा बोलत आहे. इराणने आमच्या अनेक लोकांना मारले आहे. लक्षात ठेवा, अजूनही अनेक लक्ष्ये शिल्लक आहेत,” असं डोनाल्ड ट्रम्प म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech