मेक्सिकोमध्ये धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी

0

मेक्सिको सिटी : मेक्सिकोमध्ये एका धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबाराची घटना घडली. रस्त्यावर लोक नाच-गात असताना हा गोळीबार झाला आहे.या दुर्घटनेत १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत. अचानक गोळीबार झाल्याने उपस्थितांमध्ये पळापळ सुरु झाली. मीडिया रिपोर्टनुसार, ही घटना ग्वानाजुआटो राज्याच्या इलापुआटो शहरात झाली आहे. सेंट जॉन द बॅपटिस्टच्या उत्सवात लोक रस्त्यावर होते तेव्हा हल्लेखोराने त्यांच्यावर गोळीबार केला आहे. यामध्ये १२ जणांचा मृत्यू झाला असून २० जण जखमी झाले आहेत जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांमध्ये १७ वर्षांच्या मुलाचाही समावेश आहे.

अलीकडच्या काळातील ही दुसरी घटना आहे. गेल्याच महिन्यात सॅन बार्टोलो डी बॅरिओस येथील कॅथोलिक चर्चच्या एका कार्यक्रमात गोळीबार करण्यात आला होता. यात ७ जणांचा मृत्यू झाला होता. ग्वानाजुआटो हे राज्य मेक्सिकोच्या हिंसक राज्यांपैकी एक आहे. सांता रोसा डी लिमा टोळी आणि जलिस्को न्यू जनरेशन कार्टेलसह संघटित गुन्हेगारी गटांमधील संघर्ष यासाठी कारणीभूत असतात. या गटांकडूनच बहुतांशी हिंसाचार होत आहे. या वर्षाच्या पहिल्या पाच महिन्यात या राज्यात १,४३५ खून झाले आहेत. जे मेक्सिकोच्या इतर राज्यांच्या तुलनेत दुप्पट आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech