एलॉन मस्कची पुन्हा एकदा ट्रम्पवर अप्रत्यक्ष टीका

0

वॉशिंगटन : अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प आणि जगातील सर्वात श्रीमंत व्यक्त उद्योजक इलॉन मस्क यांच्यातील संबंध आता खूपच ताणले गेले आहेत.ट्रम्प यांनी “बिग ब्युटीफुल बिल ला मंजुरी दिल्यानंतर मस्क यांनी स्वतःचा पक्षच काढला आहे.त्यानंतर आता मस्क यांनी पुन्हा एकदा सोशल मीडियावर खळबळ उडवणारी पोस्ट शेअर केली आहे. त्यांनी “जेफ्री एपस्टिन प्रकरणात आजवर किती अटक झाली? असा सवाल करत “अधिकृत अरेस्ट काउंटर” शेअर करत त्यावर शुन्य नंबर दाखवले आहेत. अशी टीका अप्रत्यक्षपणे करत मस्क यांनी ट्रम्प यांच्यावर निशाणा साधला आहे. मस्क यांनी त्यांच्या पोस्टमध्ये लिहिले,”वेळ काय झाली आहे? अरे पाहा, ही तर पुन्हा ‘कोणीही अटकेत नाही’ अशी वेळ झाली आहे!” अशी उपरोधिक टिप्पणी केली. त्यासोबतच त्यांनी एक चित्र शेअर केले ज्यात लिहिले होते: “जेफ्री एपस्टिन प्रकरणात आजवर किती अटक झाली? असा सवाल करत त्यावर शुन्य नंबर दाखवले आहेत.

ज्या दिवशी डीओजी (डिपार्टमेंट ऑफ जस्टिस) आणि एफबीआयने आपला तपास अहवाल प्रसिद्ध केला, त्यानंतर मस्क यांनी ही पोस्ट केली आहे. या अहवालात सांगण्यात आले आहे की, एपस्टिनच्या मृत्यूमध्ये हत्या किंवा कोणत्याही बड्या व्यक्तींना ब्लॅकमेल केल्याचे कोणतेही पुरावे सापडले नाहीत. तसेच, एपस्टिनकडे कोणताही “क्लायंट लिस्ट” असल्याचेही नाकारण्यात आले आहे.मात्र, अलीकडील डीओजी आणि एफबीआयच्या निष्कर्षानुसार त्याच्या मृत्यूमध्ये कोणतीही षड्यंत्राची चिन्हे नाहीत, असे स्पष्ट करण्यात आले आहे. मस्क यांच्या ‘अटक काऊंटर’ पोस्टने पुन्हा एकदा एपस्टिन प्रकरण, ट्रम्प यांच्यावरील संशय आणि सरकारी यंत्रणांवरील प्रश्नचिन्ह यांचा त्रिकोण चर्चेत आणला आहे. सोशल मीडियावर ही पोस्ट मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत असून, यामागचा उद्देश आणि त्याचे राजकीय परिणाम यावर चर्चा तापली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech