ब्राझिलिया : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ब्राझीलचा दौरा यशस्वी झाला. या दोऱ्यामध्ये ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लूला यांनी त्यांना नॅशनल ऑर्डर ऑफ द सदर्न क्रॉसचा ग्रँड कॉलर देऊन सन्मानित केले. ब्रिक्स शिखर परिषदेत पंतप्रधान मोदींनी भारताच्या जी-२० अध्यक्षपदाप्रमाणे ब्रिक्सची पुनर्परिभाषा करण्याचे आश्वासन दिले. ब्राझिलियामध्ये भारतीय समुदायाने त्यांचे भव्य स्वागत केले.ज्याचे पंतप्रधान मोदींनी कौतुक केले.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नुकतेच ब्राझीलमधील रिओ दि जानेरो येथे झालेल्या ब्रिक्स शिखर परिषदेत सहभागी झाले होते. ब्रिक्स शिखर परिषदेच्या माध्यमातून पंतप्रधान मोदींनी जगाला अनेक संदेश दिले. भारत पुढील वर्षी ब्रिक्स शिखर परिषदेचे आयोजन करेल.यादरम्यान, पंतप्रधान मोदींनी सर्व देशांना आश्वासन दिले की, भारताने जी-२० चे अध्यक्षपद भूषवल्याप्रमाणे, ते ब्रिक्सला एका नवीन स्वरूपात पुन्हा परिभाषित करेल.
ब्राझीलमधील एका कार्यक्रमात बोलताना पंतप्रधान मोदी म्हणाले की, हा सन्मान भारत-ब्राझील मैत्रीचे प्रतीक आहे. ते पुढे म्हणाले की, दोन्ही देश एकमेकांसोबत एकत्र काम करतील. दरम्यान, पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ब्राझीलचे राष्ट्राध्यक्ष लुला दा सिल्वा यांच्या उपस्थितीत भारत आणि ब्राझीलमध्ये अनेक महत्त्वाचे सामंजस्य करार करण्यात आले. दोन्ही देशांमधील व्यापार, विज्ञान, तंत्रज्ञान आणि सांस्कृतिक सहकार्य मजबूत करण्याच्या दिशेने हे करार एक मोठे पाऊल मानले जात आहे.