डॉ. श्रीकांत शिंदे यांचा मराठवाडा झंझावाती दौरा आणि भगव्याचे दृढ़ नाते

0

महाराष्ट्र राज्यात ऐतिहासिक, सांस्कृतिक आणि राजकीय दृष्ट्या मराठवाडा विभाग ही अत्यंत संवेदनशील भूमी आहे. या प्रदेशाने अनेक सामाजिक व राजकिय चळवळी अनुभवताना स्वाभिमानाची परंपरा जपली आहे. अशा या भूमीत शिवसेना आणि तिच्या भगव्या ध्वजाचे नाते हे केवळ राजकीय नसून भावनिक आणि सांस्कृतिक स्तरावर खोलवर रुजलेले आहे.

या नात्याला हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या जाज्वल्य हिंदुत्वाच्या भाषणांनी एकेकाळी स्वाभिमानाची जागृति निर्माण केलेली होती त्याला सध्याच्या काळात अधिक बळकटी देणारे नेतृत्व म्हणजे शिवसेना मुख्य नेते व उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब आहेत. त्यांनी राज्यात तसेच मराठवाड्यात संघटन उभारणीसाठी प्रभावी आणि परिणामकारक व दिशादर्शक नेतृत्व दिले आहे. त्यांच्या नेतृत्वशैलीत कार्यकर्त्यांना सोबत घेण्याची वृत्ती, निर्णयक्षमतेतील स्पष्टता आणि विकासाभिमुख दृष्टिकोन दिसून येतो. त्यामुळे छत्रपती शिवरायांच्या विचारांनी प्रेरित झालेला शिवसेनेचा भगवा झेंडा अधिक आत्मविश्वासाने पुढे जात आहे.

मराठवाड्यात पक्ष संघटना मजबूत करण्यासाठी शिवसेनेचे युवा नेतृत्व खासदार डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे यांचे विशेष योगदान दिले जात आहे. उच्चशिक्षित व तरुण नेतृत्व म्हणून त्यांनी कार्यकर्त्यांमध्ये ऊर्जा निर्माण केली असून, शिवसेनेच्या जुन्याजाणत्या तसेच दांडगा राजकिय अनुभव असलेले नेते, उपनेते, सचिव, खासदार, आमदार व जिल्हा पातळीचे अन्य लोकप्रतिनिधी तसेच पक्ष वाढीसाठी प्रामाणिक मेहनत करणारे पदाधिकारी यांना सोबतीला घेऊन नव्या पिढीला पक्षाशी जोडण्याचे काम प्रभावीपणे सुरू केले आहे.

मराठवाडा विभागाचा यशस्वी पद्धतीने आढावा दौरा करताना शिवसेनेचे सर्व ज्येष्ठ मंत्रीगण यांचे अनुभवसंपन्न मार्गदर्शन संघटन मजबूतीकरणासाठी अत्यंत उपयुक्त ठरत आहे. डॉ. श्रीकांत शिंदे यांनी स्थानिक पदाधिकारी, कार्यकर्ते आणि लोकप्रतिनिधींना विश्वासात घेऊन एकसंध आणि सक्षम संघटन उभारण्यावर भर दिला आहे.

विशेषतः ‘एस आय आर मोहिम’ (SIR अभियान) ही पक्ष संघटना अधिक व्यापक आणि सक्षम करण्यासाठी राबविण्यात येणारी महत्त्वपूर्ण योजना ठरत आहे. या मोहिमेच्या माध्यमातून बूथस्तरापर्यंत संपर्क साधून, प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा आणि जनतेशी थेट संवाद प्रस्थापित करण्याचा प्रयत्न केला जात आहे. ही मोहिम केवळ संघटनात्मक विस्तार नसून, लोकांच्या मनामनात स्थान निर्माण करण्याची प्रक्रिया आहे.

शिवसेनेचे तळागाळातील स्थानिक स्वराज्य संस्थांचे सदस्य, लोकप्रतिनिधी, स्थानिक पदाधिकारी आणि कार्यकर्ते यांना विश्वासात घेऊन, त्यांच्या सहभागातून संघटना अधिक मजबूत करण्यावर विशेष भर दिला जात आहे. त्यामुळे पक्षाची मुळे अधिक खोलवर रुजत आहेत. प्रत्येक गाव, प्रत्येक वॉर्ड आणि प्रत्येक घरापर्यंत पोहोचण्याचा हा दूरगामी फलस्वरूप संकल्प नक्कीच यशस्वी होताना दिसत आहे.

मराठवाड्यातील शेतकरी कष्टकरी जनतेचा प्रतिसादही याला सकारात्मक आहे. विविध सभा, संवाद कार्यक्रम आणि मोहिमांमधून लोकांचा वाढता सहभाग दिसून येतो. विशेषतः तरुण वर्ग, शेतकरी आणि मध्यमवर्गीय समाजघटकांमध्ये शिवसेनेविषयी विश्वास आणि अपेक्षा वाढताना दिसतायेत.

एकूणच, लोकनाथ मा. ना. एकनाथ शिंदे यांच्या यशस्वी नेतृत्वाखाली, डॉ. श्रीकांत एकनाथ शिंदे हे ना. गुलाबराव पाटील आणि ना. उदय सामंत यांच्या सहकार्याने शिवसेना मराठवाड्यात नव्या उर्जेने उभी राहत आहे. ‘एस आय आर मोहिम’ आणि संघटनात्मक बळकटीच्या माध्यमातून शिवसेना मराठवाड्याच्या घराघरात आणि मनामनात पोहोचेल, असा ठाम विश्वास सर्वसामान्य जनतेत निर्माण होत आहे.

🖊️ *दिनेश शिंदे*

राष्ट्रीय सह समन्वयक एवं

प्रसार माध्यम समन्वयक

शिवसेना पक्ष

 

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech