समाजसेवा, कुटुंबवत्सलता आणि नात्यांमधील आपुलकी यांचा सुंदर संगम म्हणजे सौ. लता (वहिनी) एकनाथ शिंदे. ११ जुलै हा दिवस त्यांच्या जीवनातील एका विशेष पर्वाचा आनंदोत्सव आहे. त्यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्या त्यागमय जीवनप्रवासाला, कर्तृत्वाला आणि माणुसकीने ओतप्रोत भरलेल्या निःस्वार्थ सेवाभावाला मनःपूर्वक सलाम !!
यशस्वी कुटुंबामागे अनेकदा एका कणखर, संयमी आणि समर्पित व्यक्तिमत्त्वाची निःशब्द तपश्चर्या दडलेली असते. सौ. लता वहिनींनी संसाराची जबाबदारी समर्थपणे सांभाळताना आपल्या सहृदयी, प्रेमळ स्वभावाने, संयमाने आणि अथक परिश्रमाने कष्टाची साथ कधीच सोडली नाही. कुटुंबातील प्रत्येक सदस्याला आधार देत, सर्वांना एकत्र ठेवत त्यांनी घराला संस्कार, आपुलकी आणि मायेचे मंदिर बनविले. सुख-दुःखाच्या प्रत्येक प्रसंगी कुटुंबाच्या पाठीशी खंबीरपणे उभे राहणे ही त्यांच्या व्यक्तिमत्त्वाची सर्वात मोठी ओळख आहे.
ना. एकनाथ शिंदे साहेबांच्या कार्यकर्ता ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि विद्यमान उपमुख्यमंत्री या संघर्षमय राजकीय व सामाजिक प्रवासात अनेक चढ-उतार आणि आव्हानात्मक प्रसंग आले. त्या प्रत्येक कठीण काळात सौ. लता वहिनींनी दाखविलेला संयम, दिलेली मानसिक ताकद आणि खंबीर साथ ही त्यांच्या यशस्वी वाटचालीमागील एक महत्त्वाची प्रेरणाशक्ती ठरली. प्रसिद्धीपासून दूर राहून त्यांनी कुटुंबाची जबाबदारी समर्थपणे सांभाळली आणि ना. एकनाथ शिंदे साहेबांना समाजसेवेच्या मार्गावर पुढे जाण्यासाठी कायम प्रेरणा व भक्कम पाठबळ दिले.
चिरंजीव डॉ. श्रीकांत शिंदे यांच्या जडणघडणीतही सौ. लता वहिनींचे योगदान अत्यंत मोलाचे आहे. त्यांना उत्तम शिक्षण लाभावे, जीवनात यशस्वी व्हावे आणि समाजासाठी काहीतरी करण्याची प्रेरणा मिळावी यासाठी त्यांनी घेतलेले कष्ट, केलेले मार्गदर्शन आणि दिलेले संस्कार अतुलनीय आहेत. मेहनत, शिस्त, नम्रता आणि सेवाभाव यांसारख्या मूल्यांची रुजवण त्यांनी आपल्या मुलाच्या व्यक्तिमत्त्वात केली.
सौ. लता वहिनींचे व्यक्तिमत्त्व केवळ कुटुंबापुरते मर्यादित नाही. शिवसेना महिला सेनेच्या माध्यमातून त्यांनी सामाजिक कार्यात सक्रिय सहभाग नोंदविला आहे. महिलांचे प्रश्न, गरजू घटकांना मदतीचा हात, विविध सामाजिक उपक्रम आणि जनसेवेच्या कार्यात त्यांनी आपल्या संवेदनशीलतेची व सामाजिक बांधिलकीची प्रचिती वेळोवेळी दिली आहे. धार्मिक, सांस्कृतिक आणि सामाजिक कार्यातही त्यांचा सहभाग प्रेरणादायी राहिला आहे.
गरजू, गोरगरीब आणि अडचणीत सापडलेल्या व्यक्तींना मदतीचा हात देणे हा त्यांच्या स्वभावाचा अविभाज्य भाग आहे. कोणतीही अपेक्षा न ठेवता दुःखाच्या क्षणी धीर देणे, संकटात साथ देणे आणि माणुसकीची ज्योत अखंड तेवत ठेवणे हीच त्यांच्या जीवनकार्याची खरी ओळख आहे. त्यांची माया, प्रेम आणि सेवाभाव अनेकांच्या आयुष्यात आशेचा किरण ठरला आहे.
लाडके नातू रुद्रांश याच्यावरील त्यांचे अपार प्रेम आणि आजी-नातवातील जिव्हाळ्याचे नाते हे त्यांच्या प्रेमळ स्वभावाचे सुंदर प्रतिबिंब आहे. त्या हे नाते जपत असताना जणू हसत्या-खेळत्या नंदनवनातील सुवर्णफूलच जपत असतात. तसेच स्नुषा सौ. वृषालीताई यांनाही त्या आईच्या ममतेने, आपुलकीने आणि जिव्हाळ्याने स्वतःच्या लेकीप्रमाणे जपत असल्याचे प्रत्येकाला प्रकर्षाने जाणवते. त्यांच्या कुटुंबवत्सल स्वभावातून भारतीय कुटुंबव्यवस्थेतील प्रेम, संस्कार आणि परस्पर सन्मानाची सुंदर परंपरा अधोरेखित होते.
सौ. लता (वहिनी) एकनाथ शिंदे या शिंदे कुटुंबाचा आधारवड असून समाजासाठी सेवाभाव, संस्कार आणि माणुसकीचा आदर्श जपणारे प्रेरणादायी व्यक्तिमत्त्व आहेत. त्यांच्या आयुष्यातील प्रत्येक दिवस उत्तम आरोग्य, आनंद, समाधान, दीर्घायुष्य आणि नवचैतन्याने परिपूर्ण असो, हीच आई भवानी जगदंबेच्या चरणी विनम्र प्रार्थना.
सौ. लता (वहिनी) एकनाथ शिंदे यांना वाढदिवसानिमित्त मनःपूर्वक हार्दिक शुभेच्छा!
त्यांचे आशीर्वादरूपी प्रेम, मायेची सावली आणि समाजसेवेची प्रेरणा सर्वांना सदैव लाभत राहो, हीच समस्त शिवसेना परिवाराच्या वतीने सदिच्छा.
