मुंबई : राष्ट्रवादी काँग्रेसचे मुख्य नेते तथा उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या अपघाती निधनामुळे राज्यावर शोककळा पसरली आहे. दरम्यान सरकारच्या वतीने अधिकृतपणे राज्यात तीन दिवसांचा दुखवटा जाहीर करण्यात आला आहे. त्यामुळे मंत्रालय, लोकभवनासहित राज्यातील प्रमुख शासकीय इमारतींवरील राष्ट्रध्वज अर्ध्यावर आणण्यात आला. संपूर्ण महाराष्ट्रात पुढील तीन दिवस शासकीय दुखवटा पाळला जाईल. सर्व सरकारी कार्यक्रम रद्द करण्यात आले आहेत. दरम्यान बारामती, बीडसहित राज्यातील अनेक भागांमध्ये आज शासकीय सुट्टी जाहीर करण्यात आली असून व्यवहार पूर्णपणे बंद करण्यात आले आहेत.