अलीकडील अनेक व्यापार करारांमुळे भारत जागतिक पातळीवर अधिक भक्कम स्थितीत- एस जयशंकर

0

मुंबई : “भारत आज जगातील देशांशी पूर्वीपेक्षा अधिक मजबूतपणे जोडला जात आहे आणि हे भारताच्या वाढत्या सामर्थ्याचे द्योतक आहे,”असे विधान परराष्ट्रीय मंत्री एस. जयशंकर यांनी केले. ते मुंबई येथे आयोजित ग्लोबल इकॉनॉमिक को-ऑपरेशन परिषदेत बोलताना बोलत होते. त्यांनी सांगितले की अलीकडे झालेल्या अनेक व्यापार करारांमुळे भारत जागतिक पातळीवर अधिक भक्कम स्थितीत असल्याचे स्पष्ट होते.

जयशंकर यांनी नमूद केले की, आज जग अत्यंत अनिश्चित आणि अस्थिर काळात प्रवेश करत आहे. त्यांच्या मते, जागतिक व्यवस्था वेगाने बदलत असून जुनी प्रणाली कमकुवत होत आहे. नवीन व्यवस्था उभारण्यास वेळ लागत असल्याने जग एका ‘दीर्घ संक्रमण काळा’तून जात आहे. त्यांनी पुढे असेही सांगितले की उत्पादन, आर्थिक ताकद, बाजारातील हिस्सा आणि निर्यात नियंत्रण यांसारख्या आर्थिक साधनांचा वापर आता शस्त्रासारखा केला जात आहे.

परराष्ट्रीय मंत्र्यांनी या प्रसंगी अलीकडे झालेल्या दोन महत्त्वाच्या करारांचा विशेष उल्लेख केला —भारत–अमेरिका करार: पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष डोनाल्ड ट्रंप यांच्यातील चर्चेनंतर महत्त्वाचा निर्णय झाला. यात अमेरिकेने भारतीय वस्तूंवरील शुल्क ५०% वरून १८% पर्यंत कमी केले. यामुळे भारताच्या निर्यातीला मोठा फायदा होईल. भारत–युरोपियन संघ व्यापार करार: मागील महिन्यात युरोपियन संघ यांच्याशी मुक्त व्यापार करार (एफटीए) चर्चेला पूर्णविराम मिळाला. यामुळे दोन्ही बाजूंचे व्यापार आणि आर्थिक संबंध अधिक मजबूत होतील.

परराष्ट्रीय मंत्री जयशंकर यांच्या मते, भारत आता आत्मविश्वासाने जागतिक भागीदारी करत आहे, आर्थिक शक्ती वाढवत आहे आणि व्यापाराच्या संधींचा विस्तार करत आहे. त्यांच्या म्हणण्यानुसार, भारत आता ‘कमकुवत देशा’प्रमाणे नव्हे तर एक मजबूत आणि विश्वासार्ह जागतिक भागीदार म्हणून जगाशी संवाद साधत आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech