अशोक खरात प्रकरण : ‘प्रत्येक महिलेला न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही’ माझ्याकडे सर्वाधिक पुरावे – फडणवीस

0

सामाजिक दबावामुळं महिला एकदम पुढे येत नाही; त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरू

मुंबई : अशोक खरातचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आम्हीच गुप्तचर यंत्रणेच्या आधारावर अशोक खरातच्या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे, असं वक्तव्य मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केलं. शिवाय, विरोधी पक्षाचे कोणकोण त्याच्याकडे गेले, त्याचे पुरावे मी देऊ शकतो. आम्हाला राजकारणात रस नाही. तर महिलांची सुरक्षा महत्त्वाची आहे. ज्या महिलांसोबत त्यांन गैरकृत्य केलं आहे, त्या प्रत्येक महिलेला आम्ही न्याय दिल्याशिवाय शांत बसणार नाही”, असा इशाराही यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिला. याप्रकरणाचे सर्वाधिक पुरावे तर माझ्याकडेच आहेत, असंही मुख्यमंत्री देवंद्र फडणवीस म्हणाले. भोंदूबाब अशोक खरात याला अटक करण्यात आली आहे. पोलीस आणि एसआयटीच्या माध्यमातून खरात चौकशी सुरू आहे. याप्रकरणी आता मुख्यमंत्री तथा राज्याचे गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विरोधकांवर निशाणा साधला आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी नुकताच माध्यमांशी संवाद साधला. त्यावेळी भोंदूबाबा अशोक खरात प्रकरणावर बोलताना विरोधकांवर निशाणा साधला. त्यानुसार, “हवेत बोलण्याला काहीच अर्थ नाही. अशोक खरातचे प्रकरण अत्यंत गंभीर आहे. आम्हीच गुप्तचर यंत्रणेच्या आधारावर अशोक खरातच्या प्रकरणाचा भांडाफोड केला आहे. हळूहळू लाजेखातर किंवा सामाजिक दबावामुळं महिला एकदम पुढे येत नाही. याची आम्हाला कल्पना होती. त्यामुळं अशाप्रकारचे पुरावे आहेत, त्यांना आणि त्यांच्या घरच्यांना धीर देऊन त्यांना समोर आणण्याचा प्रयत्न सुरू आहे. त्यामध्ये काहीप्रमाणात महिला प्रतिसाद देत आहे. याप्रकरणाची अत्यंत वरिष्ठ स्तरावर चौकशी सुरू आहे. या प्रकरणी एसआयटी स्थापन करण्यात आली आहे. नाशिक पोलीस आणि एसआयटी हे एकत्र याप्रकरणी तपास करत आहेत. याबाबत कोणत्याही परिस्थित कोणालाही सोडलं जाणार नाही”, असं मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले.

“या प्रकरणाला राजकीय रंग देण्याचा प्रयत्न केला जात आहे. कोणाजवळ काही पुरावा असल्यास आणून द्यावा, त्याच्यावरही कारवाई केली जाईल. अनेकजण जात होते, विरोधी पक्षाचे कोणकोण केले गेलेत त्याचे पुरावे मी देऊ शकतो. सर्वाधिक पुरावे याप्रकरणाचे तर माझ्याकडेच आहेत. मात्र, हे पोलिसांकडे आहेत. पोलिसांचं काम आहे. अशोक खरातला भेटत असेल तर, कारवाई होईल. पण कोणी भेटलं आहे अशावर कारवाई करायला लागलो. कोणकोण काय काय करायचं सर्वांनाच माहीत आहे. त्यांना पाणी कोणी आणि कसं दिलं हे पाहिलं असेल. ४० किलोमीटर पाण्याची लाईन कोणी दिली. या प्रकरणाचे राजकारण करू नये. हा महिलांच्या अब्रुचा प्रश्न आहे. त्यामुळे आपल्या तथाकथित शक्तींचा उपयोग करून महिलांना आस्तेच्या आधारे बळी पाडणं हा गुन्हा असून त्यांना त्याची शिक्षा भोगावीच लागेल. सरकार आणि पोलीस या प्रकरणी जे करायला हवं ते सर्व करायला तयार आहेत”, असंही फडणवीस यावेळी म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech