सामान्य कार्यकर्त्यापासून राज्याच्या मुख्यमंत्री तसेच सध्याच्या उपमुख्यमंत्री पदापर्यंतचा त्यांचा प्रवास हा संघर्ष, निष्ठा आणि हिंदुत्वाच्या विचारांप्रती असलेल्या प्रखर बांधिलकीचा प्रेरणादायी आदर्श आहे.
हिंदुत्व आणि सामाजिक एकात्मतेचा ध्यास घेत महाराष्ट्रातील तमाम समाजाला एकत्र आणण्याचा आणि हिंदू संस्कृती, धार्मिक उत्सव, सण व परंपरा यांचे जतन व संवर्धन करण्याचा ध्यास ना. एकनाथ शिंदे साहेबांनी सातत्याने घेतला आहे. गणेशोत्सव, नवरात्रोत्सव, दहीहंडी यांसारख्या उत्सवांमध्ये समाजातील सर्व घटकांचा सहभाग वाढवून त्यांनी सामाजिक ऐक्य दृढ करण्याचा प्रयत्न केला आहे. विविध अध्यात्मिक संप्रदायांना सोबत घेऊन चालण्याची त्यांची भूमिका ही व्यापक आणि समन्वयात्मक नेतृत्वाची ओळख आहे.
हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे तसेच गुरूवर्य आनंद दिघे साहेब या महान नेत्यांच्या विचारांचा वारसा त्यांनी लोककल्याणकारी पद्धतीने पुढे नेत असताना त्यांच्या हिंदुत्ववादी विचारसरणीचा प्रभाव ना. एकनाथ शिंदे यांच्या कार्यपद्धतीत स्पष्टपणे दिसून येतो. “हिंदुह्रदयसम्राट” म्हणून ओळखल्या जाणाऱ्या बाळासाहेब ठाकरे यांनी महाराष्ट्रात हिंदुत्वाची अमरज्योत प्रज्वलित केली, ती पुढे नेण्याचे कार्य शिंदे साहेब करत आहेत. तसेच धर्मवीर आनंद दिघेसाहेब हे त्यांचे राजकीय गुरू मानले जातात. ठाण्यातील जनतेसाठी अखंड झटणारे, नाथपंथाच्या विचारांनी प्रेरित आणि कट्टर हिंदुत्ववादी भूमिका घेणारे आनंद दिघे साहेब यांच्या कार्यशैलीचा प्रभाव शिंदे यांच्या नेतृत्वात प्रकर्षाने जाणवतो.
छत्रपतींच्या आदर्शांचे पालन करत महाराष्ट्राच्या अस्मितेचे प्रतीक असलेले छत्रपति शिवाजी महाराज हे ना. एकनाथ शिंदे साहेबांचे प्रेरणास्थान आहेत. छ. शिवाजी महाराजांनी स्थापन केलेल्या स्वराज्याच्या संकल्पनेतून प्रेरणा घेत, समाजातील सर्व घटकांना न्याय देणारे आणि सर्वसमावेशक प्रशासन उभारण्याचा त्यांचा प्रयत्न आहे.
छ. शिवाजी महाराजांच्या शौर्य, पराक्रम आणि लोकाभिमुख राज्यकारभाराचा आदर्श त्यांनी आपल्या राजकीय जीवनात आत्मसात केला आहे.
कार्यकर्त्यांशी जिव्हाळ्याचे नाते
जोपासणे व त्कार्यकर्त्यांशी असलेले घट्ट नाते ही त्यांची सर्वात मोठी ताकद मानली जाते. ते नेहमीच तळागाळातील लोकांशी संपर्क ठेवतात, त्यांच्या समस्या ऐकून त्यावर तत्काळ उपाययोजना करण्याचा प्रयत्न करतात. त्यामुळेच ते “अनाथांचा नाथ – लोकनाथ” म्हणून ओळखले जातात.
विकासाभिमुख दृष्टीकोनाची कल्पकता असल्याने
मुख्यमंत्री पदाच्या काळात तसेच उपमुख्यमंत्री म्हणून जबाबदारी सांभाळताना त्यांनी पायाभूत सुविधा, शहरी नागरी विकास, ग्रामीण भागातील सुविधा यावर विशेष भर दिला आहे. कोस्टल रोड, अटल सेतू, समृद्धी महामार्ग तसेच अनेक रस्ते, पाणीपुरवठा, आरोग्य आणि शिक्षण व गृहनिर्माण यांसारख्या मूलभूत गरजांवर लक्ष केंद्रित करून राज्याच्या सर्वांगीण विकासासाठी ते कायम प्रयत्नशील आहेत.
एकंदरीत, ना. एकनाथ शिंदे साहेब हे हिंदुत्व, सामाजिक एकात्मता आणि विकास या तिन्ही गोष्टींचा समतोल साधणारे नेतृत्व आहे. छ. शिवाजी महाराज, हिंदुह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब यांच्या विचारांचा वारसा पुढे नेत, महाराष्ट्राला प्रगतीच्या दिशेने नेण्याचे त्यांचे कार्य निश्चितच युवा पिढीसाठी प्रेरणादायी आहे.

– दिनेश शिंदे
राष्ट्रीय सह समन्वयक एवं
प्रचार माध्यम समन्वयक
शिवसेना पक्ष