टीव्ही चॅनेलवरील जाहिरातींची १२ मिनिटांची मर्यादा समाप्त; नवा नियम लागू

0

नवी दिल्ली : केंद्र सरकारने टीव्ही चॅनेलवर जाहिराती प्रसारित करण्याची १२ मिनिटांची मर्यादा समाप्त केली आहे. यासंदर्भात केवळ टेलिव्हिजन नेटवर्क नियम, १९९४ मध्ये सुधारणा करणारी राजपत्र अधिसूचना २१ ऑगस्ट २०२६ रोजी जारी करण्यात आली असून, त्याचबरोबर नवा नियम प्रभावी झाला आहे. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने शनिवारी जारी केलेल्या निवेदनात सांगितले की, टीव्ही प्रसारण क्षेत्रात निष्पक्ष स्पर्धा आणि व्यवसाय सुलभता सुनिश्चित करण्यासाठी जाहिरातींच्या कालावधीवरील मर्यादा हटविण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.

टीव्ही चॅनेलसाठी १२ मिनिटांची जाहिरात मर्यादा वर्ष २००६ मध्ये लागू करण्यात आली होती. त्यावेळी देशात केवळ ६२ टीव्ही चॅनेल होते. आता त्यांची संख्या ९०० पेक्षा अधिक झाली आहे. याशिवाय केबल टीव्हीच्या डिजिटायझेशननंतर डीटीएच, केबलसारख्या प्लॅटफॉर्मवर दर्शकांना मोठ्या संख्येने चॅनेल उपलब्ध आहेत. माहिती आणि प्रसारण मंत्रालयानुसार, टीव्ही उद्योगात आता पुरेशी स्पर्धा अस्तित्वात आहे. तसेच डिजिटल माध्यमांवर जाहिरातींच्या कालावधीवर अशी कोणतीही मर्यादा नसल्यामुळे पारंपरिक टीव्ही चॅनेलसाठी समान संधीचा मुद्दाही उपस्थित होता. सरकारचे मत आहे की, जाहिरातींच्या कालावधीवरील मर्यादा हटवल्यामुळे टीव्ही चॅनेलना जाहिरात बाजारात अधिक लवचिकता मिळेल आणि ईज ऑफ डुइंग बिझनेसला चालना मिळेल.आता टीव्ही चॅनेलवर जाहिरातींसाठी निर्धारित केलेली कमाल १२ मिनिटांची मर्यादा लागू राहणार नाही.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech