FatakPay कंपनीचे ‘फायनान्शियल सुपर ॲप’मध्ये रूपांतर; वाणी कपूर ब्रँड अँबेसेडर

0

मुंबई : फटॅकपेने (FatakPay) आज आपल्या विकासाचा पुढील टप्पा जाहीर केला. कंपनीचे ‘फायनान्शियल सुपर ॲप’मध्ये रूपांतर झाले. त्वरित कर्जापलीकडे जाऊन व्यापक आर्थिक उपायांच्या प्रवासाची ही मोहीम आहे. या बदलाचा भाग म्हणून कंपनीने आतापर्यंतची सर्वात मोठी एकात्मिक ब्रँड मोहीम सुरू केली. कंपनीने या नवीन वाटचालीसाठी अभिनेत्री वाणी कपूरला ब्रँड अँबेसेडर म्हणून नियुक्त केले. ही एक वर्ष चालणारी एकात्मिक मोहीम आहे. उपक्रम विविध टप्प्यांतून ग्राहकांना नवीन आर्थिक प्रवासाची ओळख करून देईल. भारताच्या मध्यमवर्गासाठी ₹५ लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्जांवर मोहिमेचा मुख्य भर असेल. पुढील टप्प्यांत ब्रँडची ही कथा अधिक व्यापक होईल.

फटॅकपेचे सह-संस्थापक आणि मुख्य व्यवसाय अधिकारी अभिषेक गांधी म्हणाले, “प्रत्येक भारतीयाला जीवनात पुढे जाण्यासाठी आर्थिक उपाय मिळावेत या विश्वासाने फटॅकपेची स्थापना झाली. आम्ही तात्काळ कर्जाच्या गरजा पूर्ण करून सुरुवात केली. ग्राहकांच्या प्रत्येक टप्प्यावर मदत करणारा आर्थिक प्रवास तयार करणे हे आमचे ध्येय होते. आज आम्ही कर्ज घेणे, संरक्षण, क्रेडिट-बिल्डिंग आणि संपत्ती निर्मिती या गोष्टी एकाच प्लॅटफॉर्मवर आणून हे ध्येय पूर्ण करत आहोत. ही मोहीम ग्राहकांच्या आर्थिक जीवनातील एका मोठ्या प्रवासाची सुरुवात आहे.” ही मोहीम डिजिटल माध्यमांद्वारे सुरू होईल. त्यानंतर कॅम्पेनच्या टेलिव्हिजन फिल्मचे अनावरण होईल. चित्रपट जबाबदार कर्ज घेण्याच्या कल्पनेला बळ देईल. हा चित्रपट ₹५ लाखांपर्यंतच्या वैयक्तिक कर्ज ऑफरची माहिती देईल.

फटॅकपेचे ब्रँडिंग आणि कम्युनिकेशन्स प्रमुख अश्विन शेट्टी म्हणाले, “प्रत्येक ब्रँडला ग्राहकांची धारणा बदलण्याची गरज भासते. ही मोहीम फटॅकपेसाठी तोच क्षण ठरतेय. आमचा व्यवसाय बदलत आहे. आम्ही आमची संपर्काची भाषाही बदलत आहोत. पारंपारिक मोहिमेऐवजी आम्ही उत्सुकता निर्माण करण्याचा मार्ग निवडलाय. वाणी कपूरची सर्वसामान्यांमध्ये असलेली प्रतिमा या प्रवासासाठी अत्यंत समर्पक ठरली.”

ही फटॅकपेची सर्वात मोठी ब्रँड कॅम्पेन आहे. ३६०-डिग्री डिस्ट्रिब्यून च्या माध्यमातून ही मोहीम राबवली जाईल. यामध्ये OTT, सोशल मीडिया, आउटडोअर जाहिराती आणि इन्फ्लुएन्सर यांचा समावेश असेल. ५ कोटींहून अधिक ग्राहक अर्ज, ३ कोटींहून अधिक ॲप डाउनलोड्स आणि दरमहा २५ लाखांपेक्षा जास्त नवीन वापरकर्त्यांसह फटॅकपेने डिजिटल आर्थिक सेवांचा विस्तार केला. ६५% हून अधिक वापरकर्ते टियर २ आणि टियर ३ शहरांमधील आहेत.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech