‘बंटवारा १९४७’ चे नवीन पोस्टर प्रदर्शित; प्रमुख पात्रांची ओळख उघड

0

मुंबई : ‘आमीर खान प्रॉडक्शन्स’च्या बहुप्रतिक्षित ‘बंटवारा १९४७’ या चित्रपटाच्या निर्मात्यांनी ‘मोशन पोस्टर’नंतर आता विविध पात्रांची पोस्टर्स प्रदर्शित केली आहेत. ही पोस्टर्स फाळणीच्या काळातील वेदना, धैर्य, आशा आणि मानवी जिद्द यांची झलक दर्शवतात. हा चित्रपट अशा एका अशांत काळातील कथा मोठ्या पडद्यावर आणतो. जेव्हा एका बाजूला जग कोलमडून पडत असतानाच काही व्यक्ती धैर्य आणि माणुसकीचा किरण बनून समोर आल्या होत्या.

प्रदर्शित पोस्टर्समध्ये शबाना आझमी (दुर्गावती देवी/माई), सनी देओल (सिकंदर मिर्झा), प्रीती जी. झिंटा (हमीदा बेगम), करण देओल (जावेद मिर्झा), अली फजल (हबीब अन्वर) आणि अभिमन्यू सिंग (याकूब खान) यांच्या भूमिकांचा समावेश आहे. या पात्रांचे रूप आणि हावभाव त्यांच्या संघर्षाचे, जिद्दीचे आणि भावनिक प्रवासाचे प्रतिबिंब दर्शवतात. विशेष म्हणजे, ‘किशन’चे पोस्टरही प्रेक्षकांचे लक्ष वेधून घेत आहे; हे पोस्टर चित्रपटाचा संवेदनशील आणि भावनिक गाभा प्रभावीपणे मांडते.

राष्ट्रीय पुरस्कार विजेते चित्रपट निर्माते राजकुमार संतोषी यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून, या चित्रपटाद्वारे ते तब्बल तीन दशकांनंतर सनी देओलसोबत पुन्हा एकदा काम करत आहेत. या चित्रपटाला ए.आर. रहमान यांनी संगीत दिले आहे, तर जावेद अख्तर यांनी गीते लिहिली आहेत. आमीर खान आणि अपर्णा पुरोहित यांची निर्मिती असलेला हा चित्रपट १४ ऑगस्ट रोजी जगभरातील चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech