🖊️ दिनेश बबनराव शिंदे
महाराष्ट्राच्या राजकारणात जनआधारित प्रबोधनकारी चळवळीची भक्कम पायाभरणी करणारे *हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे* यांनी उभारलेली शिवसेना ही केवळ राजकीय संघटना नसून ती एक सक्षम विचारधारा आहे. मराठी अस्मिता, स्वाभिमान आणि सर्वसामान्यांच्या हक्कासाठी उभी राहिलेली ही चळवळ आज नव्या युगात नव्या रूपात विस्तारत आहे. या विचारांना जनसेवेची धार देणारे *गुरूवर्य आनंद दिघे* यांच्या शिकवणीतून समाजाशी नाळ जपण्याची परंपरा अधिक दृढ झाली.
आज *शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्राचे कर्तबगार उपमुख्यमंत्री ना. एकनाथ शिंदे* यांच्या नेतृत्वाखाली शिवसेना नव्या उंची गाठण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. त्यांच्या कार्यशैलीत दिघे साहेबांची जनसेवा आणि बाळासाहेबांची विचारसरणी यांचा सुंदर संगम दिसून येतो. समाजातील शेवटच्या घटकापर्यंत पोहोचण्याची जिद्द आणि विकासाला केंद्रस्थानी ठेवण्याची भूमिका हीच या नेतृत्वाची खरी ताकद ठरते.
*खासदार डॉ. श्रीकांत शिंदे* यांच्या मार्गदर्शनाखाली नव्या दमाची युवा पिढी शिक्षण, बुद्धिमत्ता, तंत्रज्ञान आणि विकास या चार स्तंभांवर उभी राहत आहे. ही पिढी *“लोकल टू ग्लोबल”* या व्यापक दृष्टिकोनातून कार्य करत असून, आधुनिक जीवनशैलीचा स्वीकार करतानाच महाराष्ट्राच्या संस्कृती आणि परंपरेचे जतन करण्यासाठी कटिबद्ध आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या लोककल्याणकारी, सर्वसमावेशक आणि प्रगतिशील राज्यपद्धतीचा आदर्श समोर ठेवून, समाजातील प्रत्येक घटकाचा विकास साधण्याचा संकल्प या नव्या नेतृत्वाने केला आहे. सामाजिक व सेवाभावी उपक्रमांच्या माध्यमातून युवकांना प्रेरित करून एक बलशाली, सशक्त आणि जागरूक महाराष्ट्र घडविण्याचे ध्येय निश्चित करण्यात आले आहे.
शिवसेनेचा वाढता आलेख आता केवळ महाराष्ट्रापुरता मर्यादित राहिलेला नाही. सामाजिक बांधिलकी, युवक सक्षमीकरण आणि तंत्रज्ञानाधिष्ठित विकासाच्या बळावर *शिवसेना पक्ष राष्ट्रीय स्तरावर* विस्तारासाठी सज्ज होत आहे. स्थानिक प्रश्नांपासून जागतिक संधींपर्यंतचा प्रवास करताना *शिवसेना एक आधुनिक, प्रगतिशील आणि सर्वसमावेशक विचारप्रणाली* म्हणून देशभरात आपली छाप उमटवत आहे.
*स्व. बाळासाहेबांच्या “दूरदृष्टीची”पायाभरणी, स्व. आनंद दिघे यांच्या “जनसेवेची” शिकवण आणि ना. एकनाथ शिंदे यांच्या “सर्वसमावेशी” नेतृत्वाखालील नव्या पिढीची ऊर्जा या त्रिसूत्रीच्या बळावर शिवसेना आज “लोकल टू ग्लोबल” या स्वप्नाला वास्तवात उतरवण्याच्या दिशेने ठामपणे पुढे जात आहे.* हा प्रवास केवळ राजकीय विस्ताराचा नसून, तो सामाजिक परिवर्तन आणि राष्ट्रनिर्मितीच्या व्यापक ध्येयाचा आहे.
भविष्यातील शिवसेना ही नक्कीच देशाच्या जडणघडणीत एक नवा अध्याय सुरू करून शिवछत्रपतींच्या प्रेरणेने जात पात पंथ संप्रदाय या विचारांपलिकडे जाऊन हिंदवी स्वराज्याचे *सर्वसमावेशी प्रगतीची* जीवनरेखा या भारतभूमीवर उमटवेल यात कुठलाही संदेह अथवा नाही.
🖊️
*दिनेश बबनराव शिंदे*
राष्ट्रीय सह समन्वयक एवं
प्रसार माध्यम समन्वयक
*शिवसेना पक्ष*