डोंबिवलीत २४ नायजेरियन नागरिक पोलिसांच्या ताब्यात

0

डोंबिवली : डोंबिवली जवळील पलावा परिसरात पोलिसांनी कारवाई करत २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेतले. डोंबिवली आणि नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तरित्या कारवाई केली. पलावा परिसरातील डाऊन टाऊन आणि क्राऊन पलावा या इमारतींमध्ये कॉम्बिंग ऑपरेशन राबवले. या कारवाईदरम्यान २४ नायजेरियन नागरिकांना ताब्यात घेण्यात आले आहे, असे कल्याण परिमंडळ पोलीस उपायुक्त अतुल झेंडे यांनी सांगितले. ताब्यात घेण्यात आलेल्या नागरिकांमध्ये १४ पुरुष, ६ महिला आणि ४ लहान मुलांचा समावेश आहे. पोलिसांनी याबाबत अधिक चौकशी समजले की यापैकी ८ जणांकडे भारतात वास्तव्यासाठी आवश्यक असलेली अधिकृत कागदपत्रे नव्हती. त्याशिवाय ९ नायजेरियन नागरिकांवर विविध पोलीस ठाण्यात अमली पदार्थ तस्करी आणि ड्रग्ससंबंधी गुन्हे दाखल झाले आहेत.

पोलिस कारवाई वेळी इमारतीच्या चौथ्या मजल्यावरून एका नायजेरियन महिलेने उडी मारली व ती जखमी झाली. जखमी महिलेवर उपचार सुरू असल्याचे पोलिस सांगत आहेत. सदर कारवाई डोंबिवली व नवी मुंबई पोलिसांनी संयुक्तपणे गुप्त माहितीच्या आधारे केली. पलावा परिसरात परदेशी नागरिक वास्तव्यास आहेत अशी माहिती मिळाली होती. त्यानुसार सदर छापेमारी आणि कागदपत्र तपासणी मोहीम पोलिसांनी केली. याप्रकरणी संबंधित नागरिकांच्या व्हिसा, पासपोर्ट आणि इतर कागदपत्रांची पडताळणी सुरू असून बेकायदेशीर वास्तव्यास मदत करणाऱ्या घरमालकांवरही कारवाई केली जाणार असल्याचे डीसीपी अतुल झेंडे यांनी स्पष्ट केले. या मोठ्या कारवाईमुळे पलावा परिसरात एकच खळबळ उडाली असून पोलिसांचा बंदोबस्त वाढवण्यात आला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech