नवी दिल्ली : दिल्लीतील जंतर-मंतर परिसरात कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) च्या अजिंक्य शिंदे, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी ताब्यात घेतल्याची माहिती समोर आली आहे. विरोध प्रदर्शन आणि सभा घेण्यास परवानगी नसतानाही हे नेते प्रतिबंधित परिसरात पोहोचल्याने पोलिसांनी ही कारवाई केल्याचे अधिकाऱ्यांनी सांगितले. दिल्ली पोलिसांच्या माहितीनुसार, सीजेपीचे मुख्य प्रवक्ते सौरभ दास आणि राष्ट्रीय प्रवक्ते आशुतोष रांका यांच्यासह पक्षाच्या कार्यकर्त्यांना जंतर-मंतर परिसरातून ताब्यात घेण्यात आले. या परिसरात आंदोलन आणि सभा घेण्यास परवानगी नसल्यामुळे ही कारवाई करण्यात आल्याचे सांगण्यात येत आहे.यापूर्वी सीजेपीचे नेते अभिजीत दीपके, सौरभ दास आणि आशुतोष रांका यांना दिल्ली पोलिसांनी खबरदारीचा उपाय म्हणून ताब्यात घेतले होते. त्यानंतर दिल्लीतील विशेष कार्यकारी दंडाधिकारी न्यायालयाने शांतता राखणे आणि चांगले वर्तन ठेवणे या अटींवर ५० हजार रुपयांचा जामीनदार बंधपत्र सादर केल्यानंतर त्यांची सुटका केली होती. या अटींचा कालावधी एक वर्षाचा असल्याचे नमूद करण्यात आले आहे.
दीपकेची सोशल मीडियावरून प्रतिक्रियासीजेपीचे संस्थापक अभिजीत दीपके यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म ‘एक्स’वर पोस्ट करून या घटनेबाबत विरोध नोंदवला. त्यांच्या म्हणण्यानुसार, 13 ऑक्टोबर रोजी सकाळी सीजेपीचे सदस्य हातात तिरंगा घेऊन दिल्लीतील जंतर-मंतरच्या आसपासच्या प्रतिबंधित क्षेत्राकडे जात असताना पोलिसांनी त्यांना रोखून ताब्यात घेतले.या प्रयत्नादरम्यान आशुतोष रांका, सौरभ दास, अजिंक्य शिंदे आणि इतर कार्यकर्त्यांना ताब्यात घेण्यात आल्याचा दावा दीपके यांनी केला आहे.दीपकेने आपल्या पोस्टसोबत घटनास्थळावरील व्हिडिओही शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये काही लोक प्रवेशद्वारावर चढताना, हातात झेंडे घेऊन धावताना तसेच अडथळे आणि कडक सुरक्षा व्यवस्थेदरम्यान दिल्ली पोलिसांचे अधिकारी काही जणांना घेऊन जाताना दिसत असल्याचे सांगण्यात आले आहे.