रेल्वे प्रश्नासंदर्भात केंद्रीय रेल्वे मंत्र्यांची खासदार चव्हाण यांनी घेतली भेट

0

नांदेड : मराठवाड्यातील रेल्वे सुविधा अधिक सक्षम करण्याच्या दृष्टीने केंद्रीय रेल्वेमंत्री अश्विनी वैष्णव यांची माजी मुख्यमंत्री भाजप खासदार अशोक चव्हाण यांनी नवी दिल्लीत भेट घेतली. यावेळी नांदेड-हडपसर एक्स्प्रेसला पुन्हा पुणे स्थानकापर्यंत चालविणे, मुंबई–हैदराबाद वंदे भारत स्लीपर ट्रेन नांदेड मार्गे सुरू करणे, नांदेड येथील कोचिंग डेपोच्या प्रस्तावाला मंजुरी, छत्रपती संभाजीनगर–परभणी रेल्वे मार्ग दुहेरीकरणासाठी भूसंपादन प्रक्रियेला अधिक गती देणे, तसेच हजूर साहेब नांदेड रेल्वे स्थानकाचा अमृत भारत स्थानक योजनेतील समावेश या महत्त्वाच्या विषयांवर सविस्तर चर्चा केली. मराठवाड्यातील प्रवाशांना अधिक दर्जेदार सुविधा उपलब्ध व्हाव्यात, रेल्वे पायाभूत सुविधांचा विस्तार व्हावा आणि प्रदेशाच्या विकासाला चालना मिळावी, या दृष्टीने हे सर्व विषय रेल्वेमंत्र्यांसमोर मांडले. या प्रश्नांवर निश्चितच पुढील काळात कार्यवाही होईल, असा विश्वास आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech