श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टच्या बैठकीत मोठा निर्णय

0

चंपत राय, अनिल मिश्रांचे राजीनामे स्वीकृत

अयोध्या : राम मंदिरातील दान चोरी प्रकरणामध्ये श्रीराम जन्मभूमी तीर्थ क्षेत्र ट्रस्टकडून मोठा निर्णय घेण्यात आला असून महासचिव चंपत राय आणि ट्रस्टी डॉ. अनिल कुमार मिश्रा यांचे राजीनामे अधिकृतपणे स्वीकारण्यात आले आहेत. ट्रस्टच्या बैठकीत हा मुद्दा प्रमुख अजेंड्यावर होता. नियमांनुसार राजीनामा दिल्यानंतर तो आपोआप स्वीकारला जातो, अशी माहिती यावेळी ट्रस्टचे कोषाध्यक्ष स्वामी गोविंद देव गिरी यांनी दिली. राम मंदिरातील दान चोरी प्रकरण आणि आर्थिक गैरव्यवहाराच्या आरोपांनंतर महासचिव चंपत राय आणि विश्वस्त डॉ. अनिल कुमार मिश्रा यांनी नैतिकतेच्या आधारे राजीनामा देण्याचा निर्णय घेतला.

या प्रकरणात आतापर्यंत ८ जणांना अटक करण्यात आली असून तपासासाठी विशेष तपास पथक (एसआयटी) कार्यरत आहे. बैठकीदरम्यान या बैठकीत अनेक संत आणि ट्रस्ट सदस्यांनी चढावा चोरी प्रकरणावर तीव्र नाराजी व्यक्त केली. काही सदस्यांनी ट्रस्टमधील वित्तीय व्यवस्थापनातील त्रुटी गंभीर असल्याचे मान्य केले. चर्चेदरम्यान वातावरण तणावपूर्ण होते. बैठकीचे अध्यक्षस्थान महंत नृत्य गोपाल दास यांनी भूषवले. प्रकृती अस्वस्थ असूनही ते बैठकीस उपस्थित राहिले, ही बाब विशेष ठरली. विश्व हिंदू परिषदेचे संरक्षक दिनेश यांनी त्यांना बैठकीसाठी मनधरणीत महत्त्वाची भूमिका बजावली. बैठकीदरम्यान स्वामी परमानंद गिरी महाराज यांचा तीव्र संताप दिसून आला. तर काही सदस्यांनी ट्रस्टच्या कामकाजात मोठे बदल आवश्यक असल्याचे मत व्यक्त केले.

ज्या सरकारने स्थापन केलेल्या एसआयटीकडून या प्रकरणाचा सखोल तपास सुरू आहे. प्राथमिक अहवालात अनेक व्यक्तींचे जबाब नोंदवण्यात आले असून सीसीटीव्ही आणि आर्थिक नोंदींची तपासणी करण्यात आली आहे. ट्रस्टच्या पुढील बैठकीत नवीन न्यासीकांची नियुक्ती करण्याची शक्यता आहे. तसेच व्यवस्थापनात मोठे फेरबदल होण्याचीही शक्यता वर्तवली जात आहे.तपास पूर्ण होईपर्यंत कृष्ण मोहन राम यांच्याकडे तात्पुरती जबाबदारी देण्यात आली आहे. मंदिरातील दान/दक्षिणा चोरी आणि आर्थिक अनियमिततेच्या आरोपांमुळे रामजन्मभूमी ट्रस्टमध्ये हा आतापर्यंतचा सर्वात मोठा प्रशासकीय बदल मानला जात आहे. चंपत राय आणि डॉ. अनिल मिश्रा यांच्या राजीनाम्यांनंतर ट्रस्टच्या भविष्यातील रचनेत मोठे बदल होण्याची शक्यता निर्माण झाली आहे. पुढील एसआयटी अहवाल आणि ट्रस्टची आगामी बैठक अत्यंत निर्णायक ठरणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech