भाजपची नवी राष्ट्रीय कार्यकारिणी; डॉ. भारती पवार यांची उपाध्यक्षपदी

0

– राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, पियुष गोयल कोषाध्यक्ष
नवी दिल्ली  : भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन यांनी नवीन कार्यकारिणीची घोषणा केली आहे. यामध्ये वसुंधरा राजे, डॉ. भारती पवार यांची उपाध्यक्षपदी, राष्ट्रीय महामंत्री विनोद तावडे, केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांची राजेश अग्रवाल यांच्या जागी कोषाध्यक्ष पदी नियुक्ती करण्यात आली आहे. उपाध्यक्ष, महासचिव, सचिव आणि प्रवक्त्यांची यादी काळजीपूर्वक निवडण्यात आली असून, त्यात युवक आणि महिलांना विशेष प्राधान्य देण्यासोबतच जातीय विचारांचाही समावेश आहे. पुढील वर्षीच्या सुरुवातीला विधानसभा निवडणुका होणार असलेल्या उत्तर प्रदेशातील अनेक नेत्यांचा भाजपने या नव्या संघात समावेश केला आहे.

राष्ट्रीय उपाध्यक्ष : वसुंधरा राजे सिंधिया – राजस्थान, तीरथ सिंह रावत – उत्तराखंड, राम माधव – दिल्ली, बैजयंत जय पांडा – ओडिशा, श्रीमती डी. पुरंदेश्वरी – आंध्र प्रदेश, रेखा वर्मा – उत्तर प्रदेश, वर्धबेन नरेंद्रभाई दोशी – गुजरात, डॉ. भारती पवार – महाराष्ट्र, सरदार मनप्रीत सिंह बादल – पंजाब, लाल सिंह आर्य – मध्य प्रदेश, प्रो. एम. नागराज – कर्नाटक, प्रो. तारिक मंसूर – उत्तर प्रदेश, डॉ. मधुचंद्र कर – पश्चिम बंगाल,

राष्ट्रीय महामंत्री (संगठन) बी.एल. संतोष – दिल्ली, राष्ट्रीय सह महामंत्री (संगठन) शिवप्रकाश – मुंबई, सौदान सिंह – चंडीगड, राष्ट्रीय महामंत्री, विनोद तावडे – महाराष्ट्र, सुनील बंसल – दिल्ली, विप्लव कुमार देव – त्रिपुरा, स्मृति ईरानी – उत्तर प्रदेश, डॉ. सतीश पूनिया – राजस्थान, गजेंद्र पटेल – मध्य प्रदेश, हरीश द्विवेदी – उत्तर प्रदेश, संजय भाटिया – हरियाणा, राष्ट्रीय मंत्री, कविता पाटीदार, के. सुरेंद्रन, डॉ. भोला सिंह, डॉ. प्रदीप वर्मा, जगदीश ईश्वरभाई पटेल, डॉ. संदीप पाठक, श्रीमती फांगनोन कोन्याक, संगीता यादव, अनिल एंटनी, डॉ. एम. वेंकटेशन, मनोज टिग्गा, सिद्धार्थ शंभू, डॉ. स्वदेश सिंह, मृगांका देव वर्मन, रोहन गुप्ता, जय प्रकाश,

राष्ट्रीय कोषाध्यक्ष – पीयूष गोयल, राष्ट्रीय सह-कोषाध्यक्ष – राजेश मंगल, राष्ट्रीय कार्यालय प्रभारी – तरुण चुग, राष्ट्रीय कार्यालय मंत्री – महेंद्र पांडे, नॉर्थ ईस्ट

संयोजक – डॉ. संबित पात्रा, नॉर्थ ईस्ट सह-संयोजक – राजीव बब्बर, प्रकोष्ठ संकुल संयोजक – विष्णु दत्त शर्मा, प्रकोष्ठ संकुल सह-संयोजक – ऋतुराज सिन्हा, विष्णु वर्धन रेड्डी मोर्चा अध्यक्ष, डॉ. हेमांग जोशी – युवा मोर्चा, श्रीमती रूप कुमारी चौधरी – महिला मोर्चा, अमरपाल मौर्य – ओबीसी मोर्चा, बंसीलाल गुर्जर – किसान मोर्चा, शिवेश कुमार राम – एससी मोर्चा,डॉ. मन्नालाल रावत – एसटी मोर्चा, कुंवर बासित अली – अल्पसंख्यक मोर्चा,

मीडिया संयोजक – अनिल बलूनी, मीडिया सह-संयोजक – आशीष अग्रवाल, प्रदीप भंडारी, सिद्धार्थ यादव, सोशल मीडिया संयोजक – दीपक म्हस्के, सोशल मीडिया सह-संयोजक, प्रीति गांधी, शिवानंद द्विवेदी, आलोक भट्ट, अरुण यादव

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech