नवी दिल्ली : काँग्रेसचे महासचिव (संचार) जयराम रमेश यांनी नीट प्रश्नपत्रिका लीक प्रकरणात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न केल्याचा आरोप केला आहे. त्यांनी म्हटले आहे की, पंतप्रधान या प्रकरणात देशाची माफी मागण्याऐवजी स्वतःला पीडित दाखवण्याचा प्रयत्न करत आहेत. जयराम रमेश यांनी एक्सवर पोस्ट करत आरोप केला की, पंतप्रधान आपल्या विरोधकांवर आणि माजी पंतप्रधानांवर असभ्य टिप्पणी करतात आणि खोटे आरोप करून त्यांची बदनामी करण्याचा प्रयत्न करतात.त्यांनी म्हटले की, पंतप्रधानांनी एनटीएमध्ये झालेली पेपर लीक प्रकरणे, विद्यार्थ्यांच्या आंदोलनांवर झालेली कारवाई, राम मंदिर ट्रस्टशी संबंधित वाद आणि नोटाबंदीसारख्या निर्णयांसाठी देशाची माफी मागितली पाहिजे.