व्यवसायिक सिलेंडरच्या दरवाढीवरून काँग्रेसची सरकारवर टीका

0

नवी दिल्ली : व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेल्या वाढीमुळे राजकारण रंगात आले आहे. काँग्रेसने व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत झालेल्या मोठ्या उचलावर सरकारवर जोरदार टीका केली आहे. यासंदर्भात सोशल मिडीयावरपोस्ट करत काँग्रेसने सरकारवर महागाईचा चाबूक चालवल्याचा आरोप केलाय. नवीन महिन्याची सुरुवात होत असताना, एलपीजी गॅस सिलिंडर्सचे नवीन दर अधिकृतपणे जाहीर करण्यात आले आहेत. यात १९ किलोच्या व्यावसायिक एलपीजी सिलेंडरच्या किंमतीत तब्बल ९९३ रुपयांची वाढ झाली आहे. त्यामुळे दिल्लीत एका कमर्शिअल सिलेंडरची किंमत आता ३,०७१.५० रुपये झाली आहे. या दरवाढीवर प्रतिक्रीया देताना काँग्रेसने केंद्र सरकारवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसने सोशल मीडियावर एक पोस्ट शेअर करत लिहिले, “महंगाई मॅन मोदीचा चाबुक पुन्हा चालला.” काँग्रेसने आरोप केला आहे की, पंतप्रधान मोदींनी गेल्या चार महिन्यात व्यवसायिक सिलिंडरच्या किमतीत मोठ्या प्रमाणावर वाढ केली आहे. काँग्रेसच्या म्हणण्यानुसार, १ मे रोजी व्यवसायिक सिलिंडरची किंमत ₹९९३ने वाढली आहे, आणि गेल्या काही महिन्यात ही किंमत कशी वाढली हे त्यांच्या पोस्टमध्ये स्पष्ट केले आहे.

वर्षभरात आतापर्यंतची दरवाढ : १ मे २०२६: ₹९९३,१ एप्रिल २०२६: ₹२१८, ७ मार्च २०२६ : ₹११५ , १ मार्च २०२६ : ₹३१, १ फेब्रुवारी २०२६ : ₹५०, १ जानेवारी २०२६ : ₹१११ , एकूण वाढ: ₹१,५१८ काँग्रेसने आरोप केला आहे की, यामुळे सामान्य जनता आणि व्यवसायिकांवर आर्थिक ताण पडतो आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech