खऱ्या संन्याशांच्या गळ्यात आता ‘ओळखपत्र’; १० प्रमुख आखाड्यांची संमती
त्र्यंबकेश्वर : त्र्यंबकेश्वरच्या पावन भूमीत २०२७ मध्ये होणाऱ्या संहस्थ कुभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनासोबतच परिषदेनेही तयारीला वेग दिला आहे. कुंभमेळ्यातील प्रचंड गर्दीचा गैरफायदा घेत घुसखोरी करणाऱ्या बनावट आणि ढोंगी साधूंना आळा घालण्यासठी आता खया साधूंच्या गळ्यात अधिकृत ‘ओळखपत्र’ असणार आहे. अखाडा परिषदेच्या या निर्णयामुळे बनावट साधूंच्या गोटात खळबळ उडाली आहे. देशभरात भगवी वस्त्रे परिधान करून फिरणाऱ्यांची संख्य मोठी असली तरी कुंभमेळ्यासारख्या संवेदनशील आणि गर्दीच्या ठिकाणी खरे संन्यसी कोण आणि बनावट कोण, हे ओळखणे पोलीस प्रशासन तसेच भाविकांसाठी मोठे आव्हान ठरते. अनेकदा गुन्हेगारी प्रवृत्तीचे घटक साधूच्या वेशात
कुंभमेळ्यात शिरकाव करून शांतता भंग करण्याचा प्रयत्न करतात या पार्श्वभूमीवर देशातील प्रमुख दहा आखाड्यांनी एकत्र येत साधूसठी अधकृत ओळखपत्र लागू करण्याच महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. हे ओळखपत्र केवळ औपचारिक नसून त्यात संबंधित साधूची सविस्तर माहिती समाविष्ट असणार आहे. यामध्ये साधूचे नाव व पत्ता, मोबाईल क्रमांक, संबंधित आखाड्यातील अधिकृत पद, छायाचित्र तसेच आखाड्याचा अधिकृत शिक्का असणार आहे. या उपक्रमाची सुरुवात प्रयागराज येथे करण्यात आली असून, २०२७च्या त्र्यंबकेश्वर नाशक सिंहस्थ कुंभमेळ्यात याची शंभर टक्के कडक अंमलबजावणी केली जाणार आहे.
ज्या साधूंकडे अधिकृत ओळखपत्र असेल, त्यांनाच आखाड्यांच्या शाही निरवणुकीत तसेच विशेष सुविधा व व्यवस्थांमध्ये प्राधान्य दिले जाणार आहे. “कुंभमेळ्याची पवित्रता अबाधित ठेवण्यासाठी आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने हा निर्णय अत्यंत महत्त्वाचा आहे. यामुळे बनावटगिरीला आळा बसेलच, शिवाय संपूर्ण नियोजनात पारदर्शकता येईल,” असे मत आखाडा परिषदेच्या पदाधिकाऱ्यांनी व्यक्त केले. अहिल्या गोदा घाटावर साधू महंतच्या उपस्थितीत सभा आयेजित करण्यात आली होती. सर्व साधूंची श्रीपंचायत निरंजनी अखाडा येथे बैठक पार पडली. बैठकीत साधूंसाठी ओळखपत्र लागू करण्याचा निर्णय घेण्यात आला हा निर्णय अखिल भारतीय अखाडा परिषदेपुढे मांडण्यात येणार असून, त्यास औपचारिक मान्यता दिली जाईल, अशी माहिती अखिल भारतीय अखाडा परिषदेचे कोषाध्यक्ष श्रीमहंत शंकरानंद सरस्वती (आनंद अखाडा) यांनी दिलो.