यापुढे नगरपालिका, महापालिकेत समाविष्ट गावठाणांना मिळणार “प्रॉपर्टी कार्ड”……!

0

सातबाराही बंद करण्याचे महसूलमंत्री बावनकुळेंचे निर्देश

(अनंत नलावडे)
मुंबई : राज्यातील ज्या नगरपालिका आणि महानगरपालिकांमध्ये हद्दवाढीमुळे नवीन गावांचा समावेश झाला आहे, अशा भागातील जमिनींचे ७/१२ (सातबारा) उतारे आता बंद करण्यात येणार असून, या क्षेत्रातील रहिवाशांना त्यांच्या जमिनीचे ‘प्रॉपर्टी कार्ड’ (मालमत्ता पत्रक) तयार करून देण्याचे महत्त्वपूर्ण निर्देश महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांनी बुधवारी येथे दिले.या निर्णयामुळे यापुढे शहरी भागात समाविष्ट झालेल्या नागरिकांना मोठाच दिलासा मिळणार आहे.

मंत्रालयात यासंदर्भात आज महसूलमंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांच्या अध्यक्षतेखाली त्यांच्या दालनात एक बैठक पार पडली. त्यात असे निश्चित करण्यात आले की,जेव्हा एखादे गाव किंवा ग्रामीण भाग महापालिका किंवा नगरपालिकेच्या हद्दीत येतो, तेव्हा त्या जागेचे स्वरूप शेतीकडून अकृषक (एनए) किंवा नागरी वस्तीकडे वळते.अशा वेळी ७/१२ उतारा बंद करून त्याऐवजी ‘प्रॉपर्टी कार्ड’ असणे कायदेशीरदृष्ट्या अधिक सुलभ असते. त्यामुळे आता या निर्णयाची अंमलबजावणी करण्यासाठी राज्य सरकारकडून आदेशही काढण्यात येणार आहेत. त्यामुळे आता मालमत्तेचे हस्तांतरण करणे सोपे होईल,बँकांकडून कर्ज मिळवताना येणाऱ्या अडचणीही दूर होतील, आणि जमिनीच्या नोंदींमध्येही सुसूत्रता येईल, असा ठाम विश्वासही बावनकुळे यांनी व्यक्त केला.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech