राष्ट्रपतींसह अनेक नेत्यांकडून महानवमीच्या शुभेच्छा

0

नवी दिल्ली : राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू, लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला आणि संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांच्यासह अनेक नेत्यांनी सोमवारी शारदीय नवरात्रीच्या नवव्या दिवशी म्हणजेच महानवमीच्या निमित्ताने देशवासीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या. राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी ‘एक्स’वरील संदेशात म्हटले की, “दुर्गापूजेच्या पवित्र प्रसंगी देशात आणि परदेशात राहणाऱ्या सर्व भारतीयांना मी हार्दिक अभिनंदन आणि शुभेच्छा देते.”

लोकसभा अध्यक्ष ओम बिर्ला यांनी म्हटले की, गंधर्व, यक्ष, इतर दिव्य प्राणी, असुर आणि अमर हे सर्व सदैव त्यांच्या सेवेत तत्पर असतात. त्या सिद्धी प्रदान करणाऱ्या ‘सिद्धिदा’ आहेत. ज्ञान, साधना आणि सिद्धीच्या अधिष्ठात्री माता सिद्धिदात्री यांचे दिव्य स्वरूप जीवनात विवेक, आध्यात्मिक चेतना आणि आत्मबोध जागृत करते. माँ भगवतीच्या असीम कृपेने प्रत्येक व्यक्तीचे जीवन ज्ञान, संतुलन आणि धर्माने परिपूर्ण होवो. भौतिक प्रगतीसोबतच आध्यात्मिक उन्नतीचा मार्गही प्रशस्त होवो. माता सिद्धिदात्री यांचा पवित्र आशीर्वाद संपूर्ण जगात सुख, शांती, समृद्धी आणि मंगलमय वातावरणाचा प्रसार करो आणि सर्व भक्तांच्या मनोकामना पूर्ण होवोत.

संरक्षणमंत्री राजनाथ सिंह यांनी म्हटले की, महानवमीच्या पवित्र पर्वानिमित्त माता दुर्गेकडे सर्वांना योग्य विवेक, समज, विनम्रता आणि सत्कर्मांची प्रेरणा देण्याची प्रार्थना करतो. प्रत्येकाचे यश लोककल्याणाचे माध्यम बनो आणि सर्वांचे जीवन सेवा, भक्ती व धर्माच्या मार्गावर पुढे जावो. माता सिद्धिदात्री यांची असीम कृपा सर्वांवर कायम राहो.  केंद्रीय गृह आणि सहकारमंत्री अमित शाह यांनी म्हटले की, माता दुर्गेचा आशीर्वाद सर्व नागरिकांच्या जीवनात सदैव सुख, शांती आणि समृद्धी घेऊन येवो. तर केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्गमंत्री नितीन गडकरी यांनी म्हटले की, माता दुर्गेच्या नवव्या स्वरूपाला, माता सिद्धिदात्री यांना कोटी कोटी प्रणाम. चार भुजा असलेल्या माता सिद्धिदात्री सर्वांना सिद्धी प्रदान करोत.

केंद्रीय कृषी आणि शेतकरी कल्याणमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी म्हटले की, गंधर्व, यक्ष, इतर देवता आणि असुरांकडून पूजल्या जाणाऱ्या माता सिद्धिदात्री सर्व भक्तांना सिद्धी प्रदान करोत. करुणामयी माता दुर्गेचे नववे स्वरूप असलेल्या माता सिद्धिदात्री या आठ सिद्धी आणि नऊ निधी प्रदान करणाऱ्या आहेत. त्यांच्या कृपेने सर्व भक्तांच्या जीवनात गौरव, समृद्धी आणि उत्तम आरोग्य लाभो. सर्वांच्या मनोकामना पूर्ण होवोत आणि संपूर्ण सृष्टीचे कल्याण होवो. दिव्य मातेच्या चरणी हीच प्रार्थना आहे.  केंद्रीय वस्त्रोद्योगमंत्री गिरिराज सिंह यांनी म्हटले की, नवरात्रीच्या या अंतिम आणि अत्यंत महत्त्वपूर्ण दिवशी माता दुर्गेच्या नवव्या स्वरूपाचा, ‘माता सिद्धिदात्री’ यांचा आशीर्वाद सर्वांच्या जीवनात सुख, शांती, समृद्धी आणि उत्तम आरोग्य घेऊन येवो.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech