सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयाविरोधात हरभजन सिंह यांची हायकोर्टात याचिका

0

चंदीगड : राज्यसभेचे खासदार आणि माजी क्रिकेटपटू हरभजन सिंह यांनी पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाचा दरवाजा ठोठावला आहे. त्यांची सुरक्षा काढून घेण्याच्या निर्णयाविरोधात त्यांनी उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे.या याचिकेत हरभजन सिंह यांनी पंजाब पोलिसांना प्रश्न विचारला आहे की त्यांची सुरक्षा का काढून घेण्यात आली. तसेच, पंजाब पोलिसांनी दिलेली सुरक्षा पुन्हा बहाल करण्याची मागणी त्यांनी न्यायालयाकडे केली आहे. सूत्रांच्या माहितीनुसार, गेल्या शनिवारी हरभजन सिंह यांची सुरक्षा काढून घेण्यात आली होती. यापूर्वी हरभजन सिंह आणि राघव चड्ढा यांच्यासह आम आदमी पक्षाचे ७ खासदार भारतीय जनता पक्षात (भाजप) सामील झाले होते.

दरम्यान, पंजाब-हरियाणा उच्च न्यायालयाने हरभजन सिंह यांच्या सुरक्षेच्या प्रकरणात पंजाब सरकारला नोटीस बजावली आहे. खासदारांनी आपल्या घराबाहेर झालेल्या गोंधळाचा, ‘गद्दार’ असे लिहून करण्यात आलेल्या आंदोलनाचा आणि कुटुंबाच्या सुरक्षेला असलेल्या धोका यांचा दाखला देत सुरक्षा हटवण्याच्या निर्णयाला आव्हान दिले आहे. न्यायालयाने पंजाब सरकारकडून सुरक्षा पुनरावलोकनाच्या आधारे स्पष्टीकरण मागितले असून, या प्रकरणाची पुढील सुनावणी १२ मे रोजी होणार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech