गोंदिया : भारतातील एक आघाडीचा आणि सर्वात विश्वसनीय ब्रँड ‘कल्याण ज्वेलर्स’ आता महाराष्ट्रातील गोंदियामध्ये दाखल झाला आहे. १५ एप्रिल २०२६ रोजी कल्याण ज्वेलर्सच्या नव्या भव्य शोरूमचा शुभारंभ झाला. या शोरूममध्ये खरेदी करता येतील, कल्याण ज्वेलर्सच्या उत्तमोत्तम, विस्तीर्ण श्रेणीतील मनमोहक दागिने! जागतिक दर्जाच्या अतिशय देखण्या, आरामदायी वातावरणात आणि अत्याधुनिक सोयी-सुविधांसह, मनोसोक्त खरेदीचा अतुलनीय अनुभव मिळवण्यासाठी नवीन कल्याण ज्वेलर्स शोरूमला अवश्य भेट द्या.
कल्याण ज्वेलर्सचे कार्यकारी संचालक श्री. रमेश कल्याणरमन म्हणाले: “गोंदियातील कल्याण ज्वेलर्सच्या या नवीन शोरूमच्या माध्यमातून आमचे उद्दिष्ट एक ‘सर्वसमावेशक इकोसिस्टिम’ निर्माण करणे आणि आमच्या ग्राहकांच्या विविध गरजा पूर्ण करून त्यांचा खरेदीचा अनुभव अधिक समृद्ध करणे हे आहे. विश्वास आणि पारदर्शकता या आमच्या मूळ मूल्यांशी बांधील राहून, जागतिक दर्जाच्या वातावरणासह आम्ही नवनवीन घडवून आणण्यासाठी प्रयत्नशील आहोत. कल्याण ज्वेलर्समध्ये आम्ही उत्कृष्ट दर्जा आणि तत्पर सेवांवर लक्ष केंद्रित करून, ग्राहकांना अद्वितीय आणि मनमोहक दागिन्यांची विस्तृत श्रेणी सातत्याने उपलब्ध करून देऊ.”

या नवीन शोरूमच्या शुभारंभानिमित्त कल्याण ज्वेलर्सने आपल्या ग्राहकांसाठी दागिन्यांच्या घडणावळीवर ५०% पर्यंत विशेष सवलतीची घोषणा केली आहे. यासोबतच, कल्याण ज्वेलर्सचा ‘स्पेशल गोल्ड बोर्ड रेट’ देखील मर्यादित कालावधीसाठी लागू असेल. हा बाजारपेठेतील सर्वात कमी दर असतो आणि कंपनीच्या सर्व शोरूममध्ये एकसमान असतो.
कल्याण ज्वेलर्समधील प्रत्येक दागिना हा ‘बीआयएस’ हॉलमार्क असलेला असून त्यावर शुद्धतेच्या विविध चाचण्या केल्या जातात. याव्यतिरिक्त, ग्राहकांना ब्रँडचे सिग्नेचर ‘४-स्तरीय आश्वासन प्रमाणपत्र’ (4-Level Assurance Certificate) मिळते, जे सोन्याची शुद्धता, दागिन्यांची आजीवन मोफत देखभाल (Free lifetime maintenance), उत्पादनाची सविस्तर माहिती आणि पारदर्शक एक्सचेंज व बाय-बॅक धोरणांची हमी देते. आपल्या ग्राहकांना कायम सर्वोत्तम सेवा आणि उत्पादने मिळावीत याप्रती ब्रँडची बांधिलकी यामधून अधोरेखित होते.
या शोरूममध्ये कल्याणचे लोकप्रिय ‘हाऊस ब्रँड्स’ देखील उपलब्ध असतील, ज्यात मुहूरत (लग्नाचे दागिने), मुद्रा (हस्तकला केलेले अँटिक दागिने), निमाह (मंदिर शैलीतील दागिने), ग्लो (डान्सिंग डायमंड्स), झिया (सॉलिटेअरसारखे हिऱ्यांचे दागिने), अनोखी (अनकट डायमंड्स), अपूर्वा (विशेष प्रसंगांसाठी हिरे), अंतरा (लग्नासाठीचे हिऱ्यांचे दागिने), हेरा (अगदी रोज वापरता येतील असे हिऱ्यांचे दागिने), रंग (मौल्यवान खड्यांचे दागिने) आणि अलीकडेच लाँच केलेले लीला (रंगीत खडे आणि हिऱ्यांचे दागिने) या कलेक्शन्सचा समावेश असेल.
ब्रँड, त्यांची कलेक्शन्स आणि ऑफर्सविषयी अधिक माहितीसाठी कृपया येथे संपर्क साधावा – https://www.kalyanjewellers.net/