मुंबई : मुंबईतील मलबार हिल येथील वर्षा शासकीय निवासस्थानी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते “अग्निशिला” हिंदी मासिकाच्या २२ व्या स्थापना दिन विशेषांकाचे लोकार्पण संपन्न झाले. गत दोन दशकांपासून “अग्निशिला” मासिक सामाजिक प्रश्न, जनहित, माहितीचा अधिकार (RTI) आणि जनजागृतीच्या क्षेत्रात सातत्याने सक्रिय भूमिका बजावत आहे. संपादक अनिल वेदव्यास गलगली यांच्या संपादकीय नेतृत्वाखाली हे मासिक एक प्रभावी जनआंदोलन म्हणून उभे राहिले असून समाजातील अस्वस्थता, समस्या आणि परिवर्तनाचा आवाज प्रभावीपणे मांडत आहे.
यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी “अग्निशिला”च्या सामाजिक बांधिलकीचे कौतुक केले तसेच संपादक अनिल गलगली यांना त्यांच्या कार्याबद्दल अभिनंदन करून भावी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या.