“मंगेश चिवटेंसारखा निष्ठावान कार्यकर्ता हे राजकारणातील दुर्मिळ उदाहरण ; त्यांच्या त्यागाला सलाम; — उदय सामंत, उद्योगमंत्री

0

शिक्षक आमदारासाठी मंगेश चिवटे यांची सन्मानपूर्वक माघार; पक्षनिष्ठा आणि मनाच्या मोठेपणाचे उद्योगमंत्री उदय सामंत यांच्याकडून कौतुक

मुंबई : शिक्षक मतदारसंघात शिक्षकच आमदार असावा, या भूमिकेतून उपमुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब यांनी सचिन सानप यांना पाठिंबा देण्याचा निर्णय घेतल्यानंतर मंगेश चिवटे यांनी सन्मानपूर्वक माघार घेतली. स्वतःच्या उमेदवारीपेक्षा पक्षाचा निर्णय आणि नेतृत्वाचा शब्द महत्त्वाचा मानत त्यांनी पक्षनिष्ठेचा नवा आदर्श निर्माण केला आहे.

मंगेश चिवटे यांच्या या भूमिकेचे कौतुक करताना उद्योगमंत्री उदय सामंत म्हणाले, “मंगेश चिवटे यांनी दाखवलेला मनाचा मोठेपणा दुसरे कोणी दाखवू शकणार नाही. पक्षाने दिलेल्या उमेदवाराच्या पाठीशी ते सावलीसारखे उभे राहिले आहेत. त्यांच्याविषयी आमच्या मनात असलेला आदर दुप्पट झाला आहे. त्यांच्या भविष्याची अजिबात चिंता करू नका. मी त्यांना पहाटे साडेचार वाजता तारीख आणि वेळ लिहून दिलेली आहे.”

मंगेश चिवटे यांच्या त्यागाची, समर्पणाची आणि पक्षनिष्ठेची वरिष्ठ नेतृत्वाकडून झालेली ही प्रशंसा त्यांच्या कार्याची मोठी पावती मानली जात आहे. पदापेक्षा पक्ष मोठा आणि वैयक्तिक महत्त्वाकांक्षेपेक्षा नेतृत्वाचा निर्णय महत्त्वाचा, हा संदेश मंगेश चिवटे यांनी आपल्या कृतीतून दिला आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech