नाशिक : दोन्ही राष्ट्रवादी काँग्रेसने एकत्र यावं अशी चर्चा शरद पवारांच्या राष्ट्रवादी कडून होत असली तरीही अजित पवार यांच्या राष्ट्रवादीच्या नेत्यांना भाजपाशी चर्चा करावी लागेल त्यानंतरच निर्णयावर पोहोचला जाऊ शकतो असे स्पष्ट मत राज्याचे अन्नपुरवठा मंत्री आणि अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसचे ज्येष्ठ नेते छगन भुजबळ यांनी येवल्यामध्ये पत्रकारांशी बोलताना व्यक्त केले आहे. दोन्ही राष्ट्रवादी एकत्र यावेत अशी अनेकांची इच्छा आहे. ठाकरे एकत्र आले मग पवारही यावेत. परंतु, अशा काही चर्चा झाल्या की नाही याची कल्पना नाही. मुख्यमत्र्यांनीही सांगितलं की त्यांच्याशी अजित पवारांनी यासंदर्भात काहीही सांगितलं नव्हतं. तसंच, आम्हालाही याची कल्पना नाही. हे सर्व करायचं म्हणजे भाजपाबरोबर राहून करायचं आहे, त्यामुळे त्यांना विचारलं पाहिजे”, असं छगन भुजबळ म्हणाले.
राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपाच्या ज्येष्ठ मंडळींनाही विचारावं लागेल. दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत काय बोलणं झालं, कोणाबरोबर बोलणं झालं हे माझ्यासहित कोणालाही माहित नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारावंल लागेल, कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. सरकारमधून बाहेर पडायचं असेल तर भाग वेगळा”, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाबाबत भाजपाच्या ज्येष्ठ मंडळींनाही विचारावं लागेल. दोन्ही पक्षाच्या विलिनीकरणाबाबत काय बोलणं झालं, कोणाबरोबर बोलणं झालं हे माझ्यासहित कोणालाही माहित नाही. त्यामुळे मुख्यमंत्र्यांना विचारावंल लागेल, कारण आम्ही त्यांच्याबरोबर सरकारमध्ये आहोत. सरकारमधून बाहेर पडायचं असेल तर भाग वेगळा”, असंही ते म्हणाले.
पुढे ते म्हणाले की, कोणाचा स्वार्थ आहे आणि कोणाचा नाही हे जनता ठरवेल. सुनेत्रा ताईंचा शपथविधी झाला, अनेकांनी टीकेची सूर लावले. पण सुनेत्रा पवारांना विचारूनच हा कार्यक्रम झाला. त्यांच्याशिवाय कोणतंही नाव चर्चेत नव्हतं. सुनेत्रा पवारांनी संमती दिली, विधानमंडळ आणि आमदारांची परवानगी होती. मुख्यमंत्र्यांनी याबाबत राज्यपालांना सांगितलं. हे दोन ते तीन घटक महत्त्वाचे आहेत. या सर्वांनी एकसुराने होकार दिला, त्यानंतर शपथविधीचा कार्यक्रम झाला, असंही छगन भुजबळ म्हणाले.