नाशिकमधील धर्मांतरण व लैंगिक शोषणाचे प्रकरण
नाशिक : टाटा कन्सलटन्सी सर्व्हिसेसच्या (टीसीएस) नाशिक शाखेत एचआर-मॅनेजर असलेल्या निदा खानच्या जिहादी ष़डयंत्राचा खुलासा झाल्यापासून तिचा काहीही थांगपत्ता लागलेला नाही. याप्रकरणी पोलिसांनी ९ एफआयआर दाखल करून ८ जणांना आरोपी बनवण्यात आले आहे. परंतु, या घटनेची मुख्य सूत्रधार निदा खान गेल्या २० दिवसांपासून फरार असल्याची माहिती स्थानिक पोलिसांनी दिली. नाशिकच्या सामान्य मुस्लिम कुटुंबातील निदा खान टीसीएस कंपनीमध्ये मॅनेजर आणि टीम लीडर म्हणून काम बघत होती. आरोपींना दररोज कामाचे नियोजन देण्यासाठी होणाऱ्या मीटिंगमध्ये हिंदू मुलींची छळवणूक आणि त्यांच्यावर धर्मांतराचा तगादा लावण्यासाठी निदा खान ऑपरेशन डिपार्टमेंट म्हणून या सर्व गोष्टी घडवून आणत असल्याची धक्कादायक माहिती पोलीस तपासामध्ये समोर आली आहे.
या प्रकरणाचा भंडाफोड झाल्यानंतर गेल्या २० दिवसांपासून निदा फरार असून पोलिसांची ३ पथके तिच्या मागावर आहेत. परंतु, निदाचा ठाव ठिकाणा अजून लागलेला नाही. टीसीएसमध्ये काम करणाऱ्या हिंदू तरुणींचा मानसिक छळ, लैंगिक अत्याचार करवण्याचा मुख्य हेतू धर्मांतरण असल्याचे पोलिस तपासात उघड झाले आहे. उत्तर प्रदेशातील छांगुर बाबा केस प्रमाणेच नाशिकच्या प्रकरणात देखील आंतरराष्ट्रीय रॅकेट सक्रिय असल्याचा पोलिसांना संशय आहे. त्यामुळेच स्थानिक पोलिस आता या प्रकरणात राष्ट्रीय तपास यंत्रणेची (एनआयए) मदत घेत आहेत.
निदाच्या अटकेविना खुलासा अशक्य,
निदाच्या संदर्भात पोलिस रेकॉर्डवर उपलब्ध माहितीनुसार निदाचे पूर्ण नाव निदा एजाज खान असून ते अवघी २६ वर्षांची आहे. टीसीएस कंपनीत ती २०२१ पासून काम करत होती. नाशिकच्या द्वारका परिसरात निदा खानचे माहेर असून तिचा पती एका खसगी कंपनीत कामाला आहे. टीसीएसमधील मुस्लिम तरुणांच्या प्रेमात हिंदू तरुणींना अडकवण्यात निदाची मुख्य भूमिका होती. त्यासाठी निदा आरोपींनी सर्वतोपरी मदत करायची. टीसीएसमधील आरोपी मुस्लिम तरुणांच्या विरोधात ७८ तक्रारी आल्या होत्या. परंतु, एचआर मॅनेजर असलेल्या निदाने या सर्व तक्रारींवर आजतागायत काहीच कारवाई केली नाही. निदाचे आंतरराष्ट्रीय धर्मांतर टोळीशी संबंध असण्याची शक्यता बळावली आहे. त्यामुळे स्थानिक पोलिस याप्रकरणी एनआयए आणि इतर केंद्रीय एजन्सीजची मदत घेत आहेत.