रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांचा बोनस मिळणार

0

नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखालील केंद्रीय मंत्रिमंडळाने रेल्वे कर्मचाऱ्यांच्या उत्कृष्ट कामगिरीची दखल घेत, ११,४०,७७० रेल्वे कर्मचाऱ्यांना २,००९,.६१कोटी रुपयांचा ७८ दिवसांचा उत्पादकता-आधारित बोनस देण्याला मंजुरी दिली आहे. पात्र रेल्वे कर्मचाऱ्यांना दरवर्षी दुर्गा पूजा/दसरा सुट्ट्यांपूर्वी हा बोनस दिला जातो. यावर्षीही, सुमारे ११.४० लाख अराजपत्रित रेल्वे कर्मचाऱ्यांना ७८ दिवसांच्या वेतनाइतकी बोनसची रक्कम दिली जात आहे. हा बोनस रेल्वेची कामगिरी सुधारण्याच्या दिशेने काम करण्यासाठी कर्मचाऱ्यांना प्रोत्साहन देण्याचे काम करतो.

प्रत्येक पात्र रेल्वे कर्मचाऱ्याला ७८ दिवसांसाठी मिळणारी कमाल रक्कम १७,९५१ रुपये इतकी आहे. ही रक्कम ट्रॅक मेंटेनर्स, लोको पायलट्स, ट्रेन मॅनेजर्स गार्ड्स, स्टेशन मास्टर्स, पर्यवेक्षक, तंत्रज्ञ, तंत्रज्ञ मदतनीस, पॉइंट्समन, लिपिकीय कर्मचारी आणि इतर गट-सी कर्मचारी अशा विविध श्रेणींमधील रेल्वे कर्मचाऱ्यांना दिली जाईल. २०२५-२६ या वर्षात रेल्वेची कामगिरी अत्यंत चांगली राहिली. रेल्वेने १,६७० दशलक्ष टन मालवाहतुकीचा विक्रम केला आणि सुमारे ७.४१ अब्ज प्रवाशांची वाहतूक केली.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech