दुष्काळाच्या पार्श्वभूमीवर मनसेचा दीपोत्सव रद्द

0

राज ठाकरेंचे साधेपणाने दिवाळी साजरी करण्याचे आवाहन

मुंबई : महाराष्ट्रातील भीषण दुष्काळी परिस्थिती आणि ग्रामीण भागातील पाणीटंचाईच्या पार्श्वभूमीवर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी यंदाचा शिवाजी पार्कवरील दीपोत्सव साजरा न करण्याचा निर्णय घेतला आहे. प्रचंड उत्साह असतो. इथे शिवाजी पार्क मैदानामध्ये रोषणाई केलेली असते, फटाक्यांची आतषबाजी असते. ती आतषबाजी पाहण्यासाठी म्हणून महाराष्ट्रातल्या, मुंबईतल्या आहेतच, मुंबई, ठाणे, इतर सर्व ठिकाणच्या महाराष्ट्रातल्या कानाकोपऱ्यातनं लोकं तो दीपोत्सव पाहण्यासाठी म्हणून आवर्जून इथे येतात आणि त्याचा आनंद लुटतात.सगळेजण खूप इथे मजा करत असतात. परंतु या वर्षीचा दीपोत्सव हा साजरा न करण्याचा निर्णय आम्ही घेतला. आणि याचं एकमेव कारण म्हणजे महाराष्ट्रामध्ये असलेला, आलेला आणि येऊ घातलेला हा जो भयानक दुष्काळ आहे, या दुष्काळाच्या पार्श्वभूमीवरती अशा प्रकारचा उत्सव साजरा व्हावा, असं मनाला काही पटलं नाही, असं राज ठाकरेंनी सांगितले.

आज महाराष्ट्र अत्यंत एका विचित्र अवस्थेमधून जातो आहे. महाराष्ट्रामध्ये आज अनेक ठिकाणी ग्रामीण भागामध्ये आज पाण्याचा प्रश्न निर्माण झालेला आहे, दुष्काळ तर भयानक आहे आणि येणार आहे. अशा सगळ्या परिस्थितीमध्ये आपण ज्या उत्साहामध्ये दिवाळी साजरी करतोय ते पाहणं हे आपल्या महाराष्ट्रातल्या ग्रामीण भागातल्या आपले बांधव-भगिनी, या भगिनींना काय वाटत असेल, त्यांच्या कच्च्या-बच्च्यांना काय वाटत असेल, मला असं वाटतं या गोष्टींचा आपणच विचार केला पाहिजे. आणि हा सारासार विचार करता, कारण आता मुख्यमंत्र्यांनी सांगितलं की 1972 पेक्षाही जास्त भयानक हा मोठा दुष्काळ असेल आणि हे त्यांनी अगोदर जाहीर करून देखील मला असं वाटतं सत्ताधारी पक्षातल्या लोकांना बहुदा ते समजलं नाही आणि ते गरबा खेळत बसले. असो, तो त्यांचा प्रश्न आहे. परंतु इथे दिवाळी हा सण साजरा करत असताना, अशा प्रकारचा दीपोत्सव साजरा करत असताना मनाला ते काही पटत नाही आणि म्हणून या वर्षी हा निर्णय घेतला की हा दीपोत्सव साजरा करायचा नाही, असं राज ठाकरे म्हणाले.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech