धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याच्या मागणीसाठी सोनम वांगचुक रविवारपासून उपोषणाला बसणार

0

नवी दिल्ली : पर्यावरण कार्यकर्ते सोनम वांगचुक रविवारपासून दिल्लीतील जंतर मंतर येथे अनिश्चित काळासाठी उपोषणाला बसणार आहेत. कथित नीट पेपरफुटी प्रकरणी केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधान यांच्या राजीनाम्याची आणि जबाबदारीची ते मागणी करत आहेत. ही माहिती कॉकरोच जनता पार्टीचे (सीजेपी) प्रमुख अभिजित दीपके यांनी सोशल मीडियावर दिली. हे उपोषण सीजेपीच्या जंतर मंतर येथे सुरू असलेल्या आंदोलनाचा एक भाग आहे.

यापूर्वी, सोनम वांगचुक यांनी सोशल मीडियावर एका व्हिडिओ संदेशात म्हटले होते की, ते २७ जूनपर्यंत सरकारच्या प्रतिसादाची वाट पाहतील. शिक्षण व्यवस्थेत सुधारणा करणे किंवा लडाखचे पर्यावरण आणि संस्कृतीचे संरक्षण करणे यांसारख्या मुद्द्यांवर त्यांना सकारात्मक प्रतिसाद न मिळाल्यास, ते २८ जूनपासून जंतर मंतर येथे उपोषण सुरू करतील. सीजेपी ने देशभरातील तरुण आणि नागरिकांना सोनम वांगचुक आणि त्यांच्या या मोहिमेला पाठिंबा दर्शवण्यासाठी २८ जून रोजी जंतर मंतर येथे पोहोचण्याचे आवाहन केले आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech