श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर संत-महंतांच्या उपस्थितीत १८ वा दसरा मेळावा उत्साहात संपन्न!

0

बीड : विजयादशमीच्या पावन पर्वानिमित्त श्रीक्षेत्र मच्छिंद्रनाथ गडावर आयोजित १८ व्या दसरा मेळाव्यात विविध संत-महंतांच्या उपस्थितीत दर्शन घेतले आणि उपस्थित नाथभक्तांशी आमदार सुरेश धस यांनी संवाद साधला. यंदाच्या दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर शेतकरी बांधवांशी संवाद साधताना त्यांच्या अडचणी, चिंता आणि आगामी काळातील आव्हानांबाबत चर्चा केली. दुष्काळाची तीव्रता वाढण्याची शक्यता लक्षात घेता शेतकऱ्यांनी आर्थिक नियोजन करावे, अनावश्यक खर्च टाळावा आणि कोणत्याही परिस्थितीत हतबल होऊन चुकीचा निर्णय घेऊ नये, असे आवाहन त्यांनी केले. “अडचणीत असाल, तर एक फोन सुरेश धसला करा; तुमच्या मदतीसाठी मी २४ तास तत्पर आहे,” या शब्दांत शेतकरी बांधवांना आमदार सुरेश धस यांनी विश्वास दिला.

या मेळाव्यास श्रीक्षेत्र गहिनीनाथ गडाचे महंत ह भ प श्री विठ्ठल महाराज,ह.भ.प. बाळू महाराज गिरगावकर, भागवताचार्य ह.भ.प. ज्ञानेश्वर महाराज जवळेकर, काशिनाथ महाराज (गणेशगड), ह.भ.प. रामाचार्य मंदार महाराज, ह.भ.प. रामकृष्ण महाराज, उ.भ.प. रोहिदास महाराज यांच्यासह विविध संत-महंत, नाथभक्त आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech