भोंदू बाबा प्रकरणाचा राजकीय वाद वाढला; रुपाली चाकणकरांचा दुहेरी राजीनामा

0

जळगाव : भोंदू बाबा अशोक खरात प्रकरणाचे पडसाद आता राज्याच्या राजकारणात तीव्रतेने उमटू लागले आहेत. वाढत्या आरोपांच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या रुपाली चाकणकर यांनी आपल्या दोन्ही महत्त्वाच्या पदांचा राजीनामा दिला आहे. राज्य महिला आयोगाच्या अध्यक्षपदाचा राजीनामा दिल्यानंतर त्यांनी महिला प्रदेशाध्यक्षपदही सोडले आहे.

दरम्यान, या घडामोडींवर प्रतिक्रिया देताना राष्ट्रवादी शरदचंद्र पवार गटाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रोहिणी खडसे यांनी नाव न घेता अप्रत्यक्ष टीका केली आहे. “वैयक्तिक कारणांपासून सुरू झालेला ‘माज’ दोन ओळींच्या राजीनाम्यावर उतरला…” अशी पोस्ट त्यांनी सोशल मीडियावर केली आहे.

अशोक खरात याच्यावर अत्यंत गंभीर आरोप असून, भोंदूगिरीच्या आडून महिलांचे लैंगिक शोषण केल्याचा आरोप आहे. महिलांवर अत्याचार केल्याचेही समोर आले आहे. त्याच्याशी संबंधित काही व्हिडिओ आणि फोटो सोशल मीडियावर व्हायरल झाले असून प्रकरण अधिकच गंभीर बनले आहे.या प्रकरणात अशोक खरातला पाठीशी घातल्याचा आरोप रुपाली चाकणकर यांच्यावर होत असल्याने राजकीय वर्तुळात चर्चा रंगली आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech