राज्यातील २१ पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या

0

नाशिकचे पोलीस अधीक्षक पदी डॉक्टर स्वामींची नियुक्ती

नाशिक : राज्यातील २१ आयपीएस अधिकाऱ्यांच्या बदल्या गुरुवारी सायंकाळी करण्यात आले असून यामध्ये नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबई येथे बदली करण्यात आली आहे तर उत्तर महाराष्ट्रातील अहिल्यानगर धुळे आणि नंदुरबार पोलीस अधीक्षक व मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक यांचा देखील या बदल्यांमध्ये समावेश आहे. गुरुवारी राज्याचे पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्या आदेशानुसार २१ पोलीस अधीक्षक व अप्पर पोलीस अधीक्षकांच्या बदल्या करण्यात आल्या आहेत यामध्ये नाशिकचे पोलीस अधीक्षक बाळासाहेब पाटील यांची मुंबईला पोलीस उपायुक्त म्हणून बदली करण्यात आली आहे त्यांच्या जागेवरती ठाण्याचे पोलीस अधीक्षक डॉक्टर धोंडोपंत स्वामी यांची बदली करण्यात आलेली आहे.

याबरोबरच मालेगावचे अप्पर पोलीस अधीक्षक ते तेजींबर सिंधू यांची बदली जालन्याचे पोलीस अधीक्षक या पदावरती करण्यात आली आहे त्यांच्या जागेवरती परभणीचे अप्पर पोलीस अधीक्षक सुरज गुंजाळ यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे या बरोबरीने उत्तर महाराष्ट्रातील नंदुरबारचे पोलीस अधीक्षक श्रवणदत्ता यांची अप्पर पोलीस महासंचालक यांच्या कार्यालयात बदली करण्यात आलेली आहे. त्यांच्या जागेवरती अश्विनी सानप या लोहमार्ग पोलीस अधीक्षक इथून बदली करण्यात आलेली आहे. अमरावतीचे पोलीस अधीक्षक सिगुरी आनंद यांची बदली धुळे येथे पोलीस अधीक्षक या पदावरती करण्यात आलेली आहे. अहिल्या नगरचे पोलीस अधीक्षक सोमनाथ घुर्गे यांची बदली अहिल्यानगर वरून सहाय्यक पोलीस महानिरीक्षक पोलीस महासंचालक कार्यालय या ठिकाणी करण्यात आलेली आहे.

जालन्याचे पोलीस अधीक्षक अजय बंसल यांची बदली सायबर सुरक्षा विभागात पोलीस अधीक्षक या पदावरती करण्यात आलेली आहे. तर रवींद्रसिंह परदेशी यांची बदली परभणी येथून पोलीस उपायुक्त गुप्तवार्ता या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अनुप तारे वाशिमचे पोलीस अधीक्षक होते त्यांची बदली पोलीस अधीक्षक अमली पदार्थ विभाग पुणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. अनुराग जैन यांची बदली नागरी हक्क संरक्षण विभागातून मुंबई पोलीस उपयुक्त या पदावरती करण्यात आलेली आहे राजकुमार शिंदे पोलीस उपायुक्त पुणे यांची बदली पोलीस अधीक्षक लोहमार्ग पुणे या ठिकाणी करण्यात आलेली आहे. निलेश खारमोडे पोलीस अधीक्षक अमली पदार्थ विभाग यांची बदली पोलीस अधीक्षक वाशिम या ठिकाणी करण्यात आलेली आहे. आयुष नो पानी यांची बदली पोलीस अधीक्षक चंद्रपूर या ठिकाणी करण्यात आलेली आहे. गजानन राजमाने यांची बदली पोलीस फोर्स वन येथून मुंबई पोलीस उपयुक्त या पदावरती करण्यात आलेली आहे दत्ता टोरे वडे यांची बदली अप्पर पोलीस अधीक्षक अमरावती या ठिकाणी करण्यात आलेली आहे. या बदल्या नंतर येणाऱ्या काळात अजून काही बदल्या होण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech