त्रंबकेश्वर : उबाठा अध्यक्ष उद्धव ठाकरे यांना चोरून लपून भेटायची मला आवश्यकता नाही जे काही भेट असेल ती मी उघडपणे करेल, असे स्पष्ट भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केली आहे ते पुढे म्हणाले की, गोदा ते नर्मदा या यात्रेमुळे नद्यांचे महत्व विशद करणं हे जलसंधारण विभागाचे काम कौतुकास्पद असल्याचेही ते म्हणाले. त्र्यंबकेश्वर येथून गोदावरी नदीचे उगम स्थानापासून गोदा ते नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर जलयात्रा २०२६ या कार्यक्रमासाठी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे त्र्यंबकेश्वर येथे आले होते. यावेळी मुख्यमंत्री फडणवीस यांचे स्वागत जलसंधारण मंत्री राधाकृष्ण विखे पाटील, जलसंपदा मंत्री गिरीश महाजन, राज्याचे पुरवठा मंत्री छगन भुजबळ , अन्न व औषध मंत्री नरहरी जिरवाळ नाशिकचे महापौर हिमगौरी आहेर- आडके, स्थानिक लोकप्रतिनिधी, प्रमुख प्रशासकीय अधिकारी, कुंभमेळायुक्त शेखर सिंह मनपा आयुक्त मनीषा खत्री, विकास प्राधिकरणाचे मुख्य कार्यकारी अधिकारी जलज शर्मा, त्र्यंबकेश्वरच्या नगराध्यक्ष त्रिवेणी तुंगार, महाराष्ट्र पंचायती आखाडा श्री निरंजनी स्वामी सोमेश्वरनंद सरस्वती महाराज आदी उपस्थित होते.
यावेळी पत्रकारांशी बोलताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले की गोदाचे नर्मदा पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी अकल हिंदुस्थानामध्ये हिंदू देवस्थानाच्या घाटांचे पुनर्जीवन केले आहे त्यांच्या ३०० शताब्दी वर्षानिमित्त राज्य शासनाच्या जलसंपदा विभागामार्फत हा जो कार्यक्रम घेतला आहे तो कौतुकास्पद आहे त्या माध्यमातून नद्यांचे महत्त्व हे विशद केले जात आहे. अशा कार्यक्रमाच्या माध्यमातून समाजाला दिशा मिळते असा विश्वास त्यांनी व्यक्त केला.
पत्रकारांच्या प्रश्नांवरती उत्तर देताना मुख्यमंत्री फडणवीस म्हणाले की उबाठा प्रमुख उद्धव ठाकरे आणि मी लपून भेटल्या की चर्चा सुरू आहे त्याबाबतच्या बातम्या देखील प्रकाशित करण्यात आले आहे पण त्या बातम्या पूर्णपणे खोटे आहेत उद्धव ठाकरे यांना भेटायचे असेल तर मला कोणाची गरज नाही मी स्वतः त्यांच्याशी बोलू शकतो ते माझ्याशी बोलू शकतात आम्ही ओपन मध्ये भेटू शकतो त्यामुळे या बातम्यांमध्ये कुठलाही अर्थ नसल्याचे स्पष्ट करत अशा बातम्या फिरणाऱ्यांना नोटीस पाठवू असा इशारा देखील त्यांनी दिला आहे.
संजय गायकवाड यांनी शिवाजी महाराजांच्या पुस्तकाबाबत केलेल्या या सगळ्या विधानावरती बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की एक तर पहिली गोष्ट म्हणजे आपण कुठल्या गोष्टी वरती बोलतो काय बोलतो कसं बोलतो हे समजून घेतलं पाहिजे विनाकारण आकारतांडाव करणे योग्य नाही शिवाजी महाराजांबद्दल प्रत्येकाला आदर आहे प्रत्येकाच्या मनामध्ये प्रेम आहे हे सांगण्यासाठी कुठल्या ज्योतिषाची गरज नाही असे स्पष्ट करत फडणवीस यांनी शिवसेना शिंदे पक्षाचे आमदार संजय गायकवाड यांचे कान टोचताना सांगितले की, पहिली गोष्ट म्हणजे हे पुस्तक ४० वर्ष पूर्वीचे आहे त्यावरती ४० वर्षानंतर वाद उभा करणे योग्य नाही आपण कोणत्या भाषेमध्ये बोलतो ते बघितलं पाहिजे गायकवाड यांची भाषा शिवराय आहे ती योग्य नाही याबाबत सन्माननीय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे गायकवाड यांना योग्य समज देतील असा विश्वास असल्याचे ते म्हणाले.
बागेश्वर बाबा यांच्याबाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की साधू महंत आपले मत मांडत असतात त्यांनी मांडलेले मत हे त्यांच्या परीने योग्य असेल याबाबत मात्र इतिहासामध्ये असा कुठलाही प्रकारचा दाखला आढळून येत नाही असे सांगून ते पुढे म्हणाले की लोककथा तयार होतात रामायण आणि महाभारत बाबत लोककथा आहेत त्यामुळे त्या आजही मनामध्ये घर करून आहेत परंतु काही जण परिस्थितीवर अवलंबून असे विधान करतात असेही सांगून फडणवीस म्हणाले की संघाने संस्कृतीचा माणसं दिली आहेत त्यामुळे त्यावर संघासाठी प्रत्येक घरातून एक मुलगा अपेक्षित असेल असे त्यांचे म्हणणे असावे असं मत त्यांनी व्यक्त केलं.
नासिक येथे होत असलेल्या सिंहस्थ कुंभमेळा बाबत बोलताना मुख्यमंत्री म्हणाले की लवकरच आखाडा परिषदेत सोबत बैठक घेणार आहे त्यांच्याशी चर्चा केली जाणार आहे सध्या जे काम चालू आहे ते समाधान कारक असून या कामांना अजून गती द्यायची आहे येणाऱ्या काळात हे काम अधिक गतीने होतील असेही ते म्हणाले.