‘वी’तर्फे गोव्यात ५जी सेवा सुरू

0

पणजी, गोवा : देशातील महत्त्वाच्या प्रमुख शहरांमध्ये आपल्या ५जी सेवेचा विस्तार केल्यानंतर ‘वी’ या अग्रगण्य दूरसंचार कंपनीने आता गोव्यात ५जी सेवा सुरू केली आहे. यामुळे कंपनीचा या राज्यात औपचारिक प्रवेश झाला असून, कंपनीचे ५जी नेटवर्क अधिक मजबूत झाले आहे.

डेटाचा जास्त वापर होणारी ठिकाणे, मोठ्या प्रमाणावर गर्दीची ठिकाणे आणि वेगाने विकसित होणारी शहरी क्षेत्रे यांना ‘वी’ने प्राधान्य दिले आहे. भारतातील प्रमुख पर्यटनस्थळांपैकी एक असल्यामुळे गोवा हे राज्य त्या दृष्टीने महत्त्वाचे आहे. येथे स्थानिक रहिवासी आणि पर्यटक यांच्याकडून वर्षभर मोठ्या प्रमाणावर डेटाचा वापर होतो.

५जी सेवेच्या माध्यमातून या संपूर्ण राज्यात कनेक्टिव्हिटी सुधारण्याचा ‘वी’चा उद्देश आहे. वेगवान डेटा आणि त्यासंबंधीच्या सेवा यांच्या मागणीची पूर्तता करण्यासाठी ‘वी’तर्फे हे खास नेटवर्क उभारले जात आहे. विशेषतः जास्त गर्दीची ठिकाणे, लोकप्रिय पर्यटनस्थळे आणि महत्त्वाची व्यावसायिक केंद्रे येथे नेटवर्कचा अखंड आणि अधिक चांगला अनुभव देण्यावर ‘वी’चा भर आहे.

या विस्ताराबाबत बोलताना, वोडाफोन आयडियाचे क्लस्टर बिझनेस हेड (महाराष्ट्र आणि गोवा) श्री आनंद दाणी म्हणाले, “आम्ही प्रमुख बाजारपेठांमध्ये आमचे अस्तित्व मजबूत करत असून गोव्यात ‘वी’चे ५जी नेटवर्क वेगाने विस्तार करीत आहोत. गोव्यातील ही सुरुवात म्हणजे आमच्या विस्तार योजनेतील महत्त्वाचे पाऊल आहे. डेटाचा जास्त वापर होणारी ठिकाणे, मोठ्या प्रमाणावर गर्दीची ठिकाणे, तसेच प्रमुख पर्यटन आणि व्यावसायिक केंद्रांना प्राधान्य देत आम्ही नेटवर्कचा विस्तार करीत आहोत, जेणेकरून आमच्या वापरकर्त्यांना सातत्यपूर्ण आणि अधिक चांगला अनुभव मिळेल.”

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech