‘स्कूल ठीक करो’ अभियानाला विरोध का? अभिजीत दीपकेंचा भाजपवर हल्लाबोल

0

मुंबई : कॉकरोच जनता पार्टी (सीजेपी) चे अध्यक्ष अभिजीत दीपके यांनी गुरुवारी माध्यमांशी संवाद साधताना ‘स्कूल ठीक करो’ या अभियानावरून भारतीय जनता पक्षावर निशाणा साधला. त्यांनी म्हटले की, चांगल्या शाळा आणि दर्जेदार शिक्षणाचा मुद्दा हा कोणत्याही एका राजकीय पक्षाचा किंवा संघटनेचा विषय नाही, तर देशातील प्रत्येक मुलाच्या भवितव्याशी संबंधित प्रश्न आहे.
अभिजीत दीपके यांनी सांगितले की, आम आदमी पक्षासोबतच महाराष्ट्रात शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षही शाळा अधिक चांगल्या करण्याची भूमिका मांडत आहेत. त्यामुळे देशातील शाळा चांगल्या व्हाव्यात, अशी इच्छा असलेल्या प्रत्येकाचे स्वागत केले पाहिजे. शाळा सुधारण्याची चर्चा होताच भाजपचे लोक त्याला विरोध का करू लागतात, असा सवाल त्यांनी उपस्थित केला. भाजपला शिक्षण महत्त्वाचे वाटत नाही का? देशाच्या भविष्यासाठी चांगल्या शाळा आवश्यक आहेत, असे भाजपला वाटत नाही का? असा प्रश्नही त्यांनी केला.

अभिजीत दीपके यांच्यावर आम आदमी पक्षाची ‘बी टीम’ असल्याचा तसेच अरविंद केजरीवाल यांच्याकडून निधी मिळत असल्याचा आरोप केला जातो. या आरोपांवर प्रतिक्रिया देताना त्यांनी सांगितले की, वेगवेगळे लोक त्यांना वेगवेगळ्या पक्षांची ‘बी टीम’ असल्याचे सांगतात. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री त्यांना काँग्रेसची ‘बी टीम’ असल्याचे म्हणतात, तर काही जण अरविंद केजरीवाल यांच्या ‘बी टीम’चा आरोप करतात.अभिजीत यांनी उपरोधिक टोला लगावत म्हटले की, “सर्वांनी एकत्र बसून ठरवून घ्यावे की अखेर मी कोणाची ‘बी टीम’ आहे.” ते पुढे म्हणाले, “आम्ही कोणत्याही पक्षाची ‘बी टीम’ नाही. आमच्या मते, आम्ही विद्यार्थ्यांची ‘ए टीम’ आहोत.”

अभिजीत दीपके यांच्या शैक्षणिक पात्रतेवर आणि पदवीवरून उपस्थित केले जात असलेल्या प्रश्नांवरही त्यांनी प्रतिक्रिया दिली. त्यांनी म्हटले की, सार्वजनिक जीवनात असलेल्या व्यक्तींच्या पदवी आणि शिक्षणाबाबत प्रश्न विचारले जाऊ शकतात. विशेषतः निवडणूक लढवणाऱ्या व्यक्ती आणि घटनात्मक पदांवर असलेल्या व्यक्तींच्या शैक्षणिक पात्रतेबाबत प्रश्न विचारले गेले पाहिजेत. देशातील अनेक खासदारांकडून स्वर्ण समाजासाठी आयोग स्थापन करण्याची मागणी केली जात आहे. याबाबत अभिजीत दीपके यांनी म्हटले की, ही मागणी करणाऱ्यांना आपली भूमिका मांडण्याचा पूर्ण अधिकार आहे.

About Author

Leave A Reply

Maintain by Designwell Infotech