सेरेना विल्यम्सला विम्बल्डनसाठी वाइल्डकार्ड, चार वर्षांनंतर एकेरीत पुनरागमनास सज्ज

0

लंडन : अमेरिकन टेनिसपटू सेरेना विल्यम्स पुन्हा एकदा ग्रँडस्लॅम स्पर्धेत पुनरागमन करण्यास सज्ज झाली आहे. २३ वेळा ग्रँडस्लॅम विजेत्या ठरलेल्या सेरेनाला विम्बल्डन २०२६ च्या एकेरी स्पर्धेसाठी अंतिम वाइल्डकार्ड देण्यात आले आहे. जवळपास चार वर्षांनंतर मोठ्या स्पर्धेत एकेरीतील हा तिचा पहिलाच सहभाग आहे. सेरेनाला तिची मोठी बहीण, व्हीनस विल्यम्ससोबत दुहेरी स्पर्धेसाठी आधीच वाइल्डकार्ड मिळाले होते. सात वेळा विम्बल्डन चॅम्पियन राहिलेल्या सेरेनाने या प्रतिष्ठित स्पर्धेत शेवटचा सहभाग २०२२ मध्ये घेतला होता. ती पहिल्याच फेरीत फ्रेंच टेनिसपटू हार्मोनी टॅनकडून पराभूत झाली होती. त्याच वर्षी अमेरिकन ओपनमधील तिचा प्रवास तिसऱ्या फेरीतच संपला होता. त्यावेळी, सेरेनाने टेनिसमधून निवृत्तीची घोषणा केली नव्हती, ती या खेळात एका नवीन टप्प्याकडे वाटचाल करत असल्याचे म्हटले होते.

गेल्या वर्षी तिने डोपिंगविरोधी चाचणी कार्यक्रमात पुन्हा प्रवेश केल्यानंतर, तिच्या पुनरागमनाबद्दलच्या चर्चा वाढल्या होत्या. तसेच तिने कॅनेडियन युवा टेनिसपटू व्हिक्टोरिया म्बोकोसोबत महिला दुहेरित खेळत टेनिस कोर्टवर पुनरागमन केले. त्यानंतर तिने चेक प्रजासत्ताकची टेनिसपटू कॅरोलिना मुचोव्हासोबत दुहेरी स्पर्धेतही भाग घेतला. आता सर्वांच्या नजरा विम्बल्डनवर असतील, जिथे सेरेना पुन्हा एकदा एकेरीच्या कोर्टवर उतरेल आणि आपल्या शानदार कारकिर्दीत एक नवीन अध्याय सुरु करण्याचा प्रयत्न करेल. या वर्षीची विम्बल्डन स्पर्धा २९ जून ते १२ जुलै दरम्यान होणार आहे.

About Author

Comments are closed.

Maintain by Designwell Infotech